For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीपीएस-आधारित एम-वाहन फिटनेस अॅप

06:25 AM Mar 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
जीपीएस आधारित एम वाहन फिटनेस अॅप
Advertisement

66 आरटीओ कार्यालयांत जारी : वाहनांच्या फिटनेसची चाचणी अनिवार्य, जनतेला जलद सेवा मिळण्याची अपेक्षा

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य सरकारने राज्याच्या वाहतूक खात्यात पारदर्शकता आणण्यासह भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील एकूण 66 आरटीओ कार्यालयांमध्ये जिओ-फेन्सिंग-आधारित ‘एमवाहन फिटनेस’ मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे वाहनांच्या फिटनेस चाचण्या घेणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

Advertisement

परिवहन मंत्री रामलिंगा रे•ाr यांच्या उपस्थितीत ही नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रात विश्वास निर्माण झाला आहे. वाहनांच्या फिटनेस चाचण्या घेण्यासाठी प्रत्येक आरटीओ कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात एक विशिष्ट क्षेत्र (जिओ-फेन्सिंग) ओळखले गेले आहे. वाहने प्रत्यक्ष त्याठिकाणी उपस्थित राहिल्यासच हे अॅप काम करणार आहे.

वाहनांच्या तपासणीदरम्यान, सहा (6) वेगवेगळ्या दिशांनी वाहनाचे फोटो काढून ते अॅपमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे. यामुळे वाहनाशिवाय प्रमाणपत्र मिळविण्यात होणाऱ्या बेकायदेशीर प्रकरणांना आळा बसणार आहे. फिटनेस प्रमाणपत्रे देताना यापूर्वी होणाऱ्या तक्रारी दूर करण्यासाठी एनआयसीने हे अॅप्लिकेशन विकसित केले आहे. यामुळे परिवहन विभागाची जबाबदारी वाढणार आहे. वाहनांची शास्त्राsक्त पद्धतीने तपासणी होणार असल्याने फक्त चांगल्या स्थितीत असलेली वाहनेच रस्त्यावर उतरणार आहेत. वाहनांनाच रस्त्यावर परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी होण्यास मदत होईल.

राज्यात 30 लाखांहून अधिक व्यावसायिक वाहने आहेत. या सर्व वाहनांना टप्प्याटप्प्याने हा नियम लागू केला जाणार आहे. दररोज किमान 20 टक्के वाहनांची पुनर्रतपासणी करण्याचे निर्देश नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या ‘एम-वाहन’ तंत्रज्ञानामुळे वाहतूक खात्यात फिटनेस प्रमाणपत्र देण्यातील दीर्घकाळापासून चालत आलेली त्रुटी दूर झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे जनतेला अधिकृत आणि जलद सेवा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.