For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गव्हर्न्मेंट टूलरुम-ट्रेनिंग सेंटरच्या डिप्लोमा प्रवेशाला सुरुवात

10:51 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
गव्हर्न्मेंट टूलरुम ट्रेनिंग सेंटरच्या डिप्लोमा प्रवेशाला सुरुवात
Advertisement

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : उद्यमबाग येथे गव्हर्न्मेंट टूलरुम अँड ट्रेनिंग सेंटरतर्फे यावर्षीही डिप्लोमा अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग, डिप्लोमा इन प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग, डिप्लोमा इन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स व पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन या अभ्यासक्रमांकरिता प्रवेश दिला जात आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत, अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डी. जी. मोगरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. कौशल्य विकास उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी गव्हर्न्मेंट टूलरुम अँड ट्रेनिंग सेंटरतर्फे उद्यमबाग येथे डिप्लोमा कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. सुसज्ज इमारतीत आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत. त्याचबरोबर शंभर टक्के प्लेसमेंटची हमी दिली जाते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी लवकर उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कौशल्य कर्नाटक योजनेंतर्गत एसएसएलसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत. बेळगावसह महानगरातील उद्योगांना कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात ज्या कौशल्यांची गरज आहे, त्याची संपूर्ण माहिती तीन वर्षांच्या डिप्लोमामध्ये दिली जाते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाला प्रवेश घेता येतो. त्याचबरोबर आयटीआय व बारावी विज्ञान उत्तीर्णांना थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जातो. तसेच केईएकडून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी उद्यमबाग येथील कॉलेजशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागप्रमुख अरविंद के. यांनी केले. यावेळी रमाकांत मठ यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.