सरकार मराठ्यांना टिकणारे आणि स्वतंत्र आरक्षण देणार - मंत्री केसरकर
सावंतवाडी | प्रतिनिधी
मराठा बांधवांना स्वतंत्र तसेच टिकणारे आरक्षण सरकार देणार आहे. नोकरी आणि शिक्षण या दोन घटकांमध्ये मराठा बांधवांना आरक्षण आवश्यक आहे . आणि निश्चितपणे सरकार टिकणारे आरक्षण देणार आहे. मात्र मराठा बांधवांनी आरक्षण संदर्भात जो डाटा गोळा केला जात आहे. ,त्याला सहकार्य करावे आंदोलनात्मक भूमिका घेऊ नये असे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मराठा बांधव हे भूमिहीन आहेत तसेच मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत . एकंदरीत हा सर्व डाटा गोळा केला जात आहे. मराठा बांधवांना स्वतंत्र आरक्षण आणि ते टिकणारे आरक्षण आवश्यक आहे. राजकारणामध्ये आरक्षणाची तशी आवश्यकता नाही. राजकारणामध्ये मराठा बांधवांना योग्य स्थान मिळत आहे. मात्र ,नोकरी आणि शिक्षणामध्ये बदलत्या काळात आरक्षण आवश्यक आहे. आणि जे आरक्षण टिकेल असे स्वतंत्र आरक्षण निश्चितपणे सरकार देणार असेही ते म्हणाले . राज्यातील 61 हजार शिक्षकांना 31 डिसेंबर पर्यंत टप्पा अनुदान दिले जाणार आहे . तसेच ज्या शाळा पटसंख्या अभावी टप्पा अनुदानापासून दूर आहेत त्या संदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे .असेही त्यांनी स्पष्ट केले.