ओपीएस पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी नोकर संघाची निदर्शने
बेळगाव : कर्नाटकात एनपीएस रद्द करून ओपीएस पेन्शन जारी करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदनही देण्यात आले आहे. राज्य एनपीएस नोकर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लोकेश एन. टी. व सचिव आर. व्ही. हैबत्ती आदींसह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 19 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे एनएमओपीएसची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली. केंद्र सरकारने सुरू केलेल्या युपीएस पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना कोणतीच सुरक्षा नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ही व्यवस्था त्वरित मागे घ्यावी. एनपीएसचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने समिती नियुक्त केली आहे. त्याचाही संघटनेने विरोध केला आहे. सरकारने एनपीएस रद्द करून ओपीएस पेन्शन व्यवस्था जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे.