For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निखिल गुप्ताच्या संपर्कात भारत सरकार

06:22 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
निखिल गुप्ताच्या संपर्कात भारत सरकार
Advertisement

तुरुंगात तीनवेळा राजनयिक अधिकाऱ्यांनी घेतली भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी असलेल्या निखिल गुप्ताला तीनवेळा कॉन्स्युलर अॅक्सेस देण्यात आला असल्याची माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे. निखिल गुप्ता सध्या झेक प्रजासत्ताकमधील तुरुंगात कैद आहे. त्याला प्रागच्या एका विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. अन्य देशाचा व्यक्ती एखाद्या देशाच्या तुरुंगात कैद असल्यास कॉन्स्युलर अॅक्सेस अंतर्गत संबंधित देशाचे राजनयिक किंवा अधिकाऱ्यांना कैद्याची भेट घेण्याची अनुमती दिली जाते.

Advertisement

एक भारतीय नागरिक सध्या झेक अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. अमेरिकेत प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या प्रलंबित आहे. आम्हाला तीनवेळा कॉन्स्युल अॅक्सेस मिळाला आहे. आम्ही आवश्यकतेनुसार त्या व्यक्तीला कॉन्स्युल असिस्टेंस देखील देत असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.

या व्यक्तीच्या कुटुंबाने मदतीसाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या आम्ही याप्रकरणी काहीही बोलणार नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रतीक्षा करू असे बागची यांनी सांगितले आहे.

पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी असलेल्या निखिल गुप्ताच्या वतीने त्याच्या कुटुंबाने मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निखिलला प्रागच्या तुरुंगात अवैध पद्धतीने कैद करण्यात आले आहे. तुरुंगात त्याला बळजबरीने पोर्क अणि बीफ देण्यात आले असून हे हिंदू धर्मानुसार निषिद्ध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या अनुमतीशिवाय तो कुणालाही फोन देखील करू शकत नसल्याचे प्रागच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. निखिलला 19 जुले रोजी पहिल्यांदा भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची अनुमती देण्यात आली होती. त्याच्या 20 दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप

प्राग उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच त्याच्या कुटुंबासोबत बोलण्याची अनुमती मिळाली होती. झेक प्रजासत्ताकमध्ये निखिलच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. तसेच त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. तर सर्वोच्च न्यायलयाने हे प्रकरण संबंधित देशाच्या न्यायालयासमोर मांडण्याची सूचना केली आहे. तसेच याचिकाकर्त्याला पुढील सुनावणीपूर्वी याचिकेची प्रत साद करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 4 जानेवारी रोजी होणार आहे.

अमेरिकेकडून भारतावर आरोप

न्यूयॉर्कमध्ये पन्नूवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता, या कटामागे भारतीय अधिकाऱ्याच हात होता असा दावा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता. जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतरच अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारतासमोर हा मुद्दा उपस्थित केला होता.

Advertisement
Tags :

.