For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Govt Notice to META ‘मेटा-व्हॉट्सअॅप’ला केंद्र सरकारची नोटीस नवीन युझरनेमविषयक फिचर थांबवण्याचे निर्देश

10:25 PM Jul 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
govt notice to meta ‘मेटा व्हॉट्सअॅप’ला केंद्र सरकारची नोटीस नवीन युझरनेमविषयक फिचर थांबवण्याचे निर्देश
Advertisement

► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारतात व्हॉट्सअॅपच्या नवीन युझरनेम फीचरच्या वापराबाबत ‘मेटा’ला नोटीस जारी केली आहे. केंद्र सरकारने मेटा-व्हॉट्सअॅपला भारतात हे फीचर सुरू करू नयेत असे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी कंपनीला तीन दिवसांत प्रतिसाद देण्यास सांगितले आहे. ऑनलाईन फसवणूक आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षेशी संबंधित संभाव्य धोक्यांमुळे सरकार या फीचरचा आढावा घेत आहे. तपासादरम्यान कोणतीही अनियमितता आढळल्यास मेटावर पुढील कारवाई केली जाऊ शकते.
केंद्र सरकार व्हॉट्सअॅपच्या नवीन युझरनेम फीचरच्या गोपनीयता आणि सुरक्षा पैलूंची तपासणी करणार आहे. जर पुरेशी सुरक्षा उपाययोजना लागू केली नाही, तर सायबर गुन्हेगार त्याचा गैरवापर करू शकतात, असा दावा सध्या केला जात आहे. भारतातील ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता, ही नवीन प्रणाली वापरकर्त्यांची सुरक्षा मजबूत करेल की फसवणूक करणाऱ्यांसाठी एक नवीन मार्ग बनेल याची शहानिशा सरकारला तपासायची आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.