For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारी नोकऱ्यांचा बाजार,दलालांच्या यादीत रोज भर

12:37 PM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरकारी नोकऱ्यांचा बाजार दलालांच्या यादीत रोज भर
Advertisement

फसवणूक झालेल्या पाच जणांची नवीन नावे समोर : एकजण पर्ये भागातील

Advertisement

पणजी : विविध सरकारी खात्यांमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली इच्छुकांना लाखोंचा चुना लावणाऱ्यांची यादी माऊतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन नावांची भर पडत आहे. काल बुधवारी एकाच दिवसात पाच नवीन नावे समोर आली असून यापैकी एकजण पर्ये भागातील असल्याची माहिती मिळाली आहे. पूजा, प्रिया, दीपश्री या महाठग महिलांनी अनेकांना सरकारी नोकऱ्यांची भुरळ घालून अक्षरश: लाखो ऊपयांना लुटले आहे. त्या पैशातून त्या स्वत: मात्र ‘रंकाच्या राव’ बनल्या होत्या. कोट्यावधी ऊपयांची मालमत्ता जमवून ऐशोआरामाचे जीवन जगत होत्या. त्यांच्याकडून नागवल्या गेलेल्यांपैकी बऱ्याच जणांनी स्वत:कडील सोनेनाणे तारण ठेऊन मिळविलेले लाखो ऊपये या ठगांच्या हाती सोपविले होते. त्यामुळे सध्या त्यांची परिस्थिती ‘तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे’ अशी बनली आहे.

पूजा करायची दुकानात नोकरी

Advertisement

एकट्या पूजाकडेच दीडेक कोटी किंमत भरतील अशा पाच आलिशान कार आणि विद्यमान बाजारभावात किंमत केल्यास किमान दोन कोटी ऊपये किंमतीचे चार फ्लॅट अशी प्रचंड मालमत्ता सापडली आहे. त्यावरून तिच्या जीवनशैलीची प्रचीती यावी. प्राप्त माहितीनुसार हीच पूजा काही वर्षांपूर्वी पणजीत एका दुकानात काऊंटर सेल्समन म्हणून नोकरी करत होती. त्यानंतर तिचा एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीशी विवाह झाला. अशावेळी एवढी कोट्यावधीची माया तिने कशी जमविली? त्यामागील तिचा बोलविता धनी कोण होता? असे असंख्य प्रश्न अनुत्तरीत आहेत.

प्रियाची रेल्वे ऊळावरून घसरली!

प्रिया यादवची परिस्थिती तर पूजापेक्षाही वाईट होती. नवऱ्याने सोडचिठ्ठी दिल्यामुळे ती डिचोली परिसरात घरकामे करून गुजराण करत होती. अशावेळी अचानक तिलाही कुणाकडून तरी ‘यशाची गुऊकिल्ली’ सापडली आणि रातोरात करोडपती बनण्याचा धंदा तिने आरंभला. याच क्षेत्रात वावरणाऱ्या पूजा, दीपश्री या महिला गोव्यात सरकारी नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना लुबाडत होत्या. तर प्रियाने केंद्र सरकारात चक्क रेल्वेत नोकऱ्या देण्याचा फंडा अवलंबला आणि अनेकांना त्यात अडकवत गंडा घातला. सध्या तिची रेल्वे ऊळावरून घसरली असून थेट गजाआड पोहोचली आहे.

सरकारी नोकऱ्या मिळवून देणाऱ्या व्यवसायातील तिसरी संशयित दीपश्री ही सुद्धा जवळजवळ कोट्याधीशच होती. तिच्याकडूनही तीन कारगाड्या व दोन दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून ही ज्ञात मालमत्ता आहे. त्याशिवाय अन्य अज्ञात संपत्ती जमेस धरल्यास ती कोट्यावधींची मालकीण असेल हेच स्पष्ट होत आहे. दिप्ती प्रभू या एका नोकरीइच्छुक महिलेचीच तिने 10 लाखांची फसवणूक केली होती. त्यावरून हे सिद्ध होत आहे.

अशा प्रकारे या नोकऱ्यांच्या बाजारात उतरलेल्या दलालांची मंगळवारपर्यंत डझनभर होती. बुधवारी त्यात आणखी चौघांची भर पडली आहे. पैकी रामेश्वर मांद्रेकर हा युवक सांखळीतील असून पोळे काणकोण येथील रवीत भंडारी याच्या संगनमताने त्यांनी कृष्णा नाईक या युवकाकडून नोकरी देण्याच्या आश्वासनावर आगाऊ 5 लाख ऊपये घेतले होते. त्या युवकाला पोलिसखात्यात नोकरी देण्याचा वायदा केलेले सदर दोन्ही युवक सध्या स्वत: पोलिसांच्या ‘खात्यात’ आहेत. हे प्रकरण वर्ष 2020 मध्ये घडले होते. गत महिन्यात अशाच प्रकरणात काणकोण पोलिसांनी तिघांना अटक केली होती. एका युवतीला नोकरी देण्याच्या आश्वासनावर त्यांनी तिची 15 लाखांना फसवणूक केली होती.

Advertisement
Tags :

.