राम मंदिराच्या बाबतीत चुकिचा मजकूर प्रसारित करण्यावर सरकारकडून बंदी
सरकारने प्रसारमाध्य़मे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राम मंदिराच्या संबंधित खोटी आणि फेरफार केलेला आशय प्रकाशित करण्यापासून मज्जाव केला आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्धाटनाच्या पार्श्वभुमीवर सोशलमीडीयावर VIP तिकिटे, राममंदिराचा प्रसाद यांच्यासह अनेक सोय़ी देण्यासाठी खोट्या लिंक्स सोशलमाध्यमांवर फिरत आहेत. त्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की "काही असत्य, प्रक्षोभक आणि बनावट संदेश देशातील रामभक्तांमध्ये पसरवले जात आहेत. विशेषत: सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर, अशा पद्धतीच्या खोट्या माहीतीमुळे जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शकता आहे." असे म्हटले आहे.
तसेच पुढे माहीती देताना या निवेदनात म्हटले आहे कि, "यापुढे, अशा घटनांची खबरदारी म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना राम मंदिरा संबंधित कार्यक्रमाची खोटी माहीतीचे आयोजन प्रदर्शित किंवा प्रकाशन कोणालाही करता येणार नाही." असे म्हटले आहे.
काही दिवसापुर्वी ई- कॉमर्स वेबसाइट असलेल्या अॅमेझॉनला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसादा'ची सूची आपल्या वेबसाईटवरून काढून टाकण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना Amazon ने सरकारच्या धोरणांच्या अनुषंगाने अशा सूचींविरुद्ध योग्य कारवाई करत असल्याचा खुलासा दिला आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी, बनावट QR कोड असलेला एक WhatsApp संदेश श्रीरामांच्या प्राण- प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी व्हीआयपी तिकिटांच्या वाटपांसाठी मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता. मंदिर ट्रस्टने यावर स्पष्टीकरण देताना प्राण- प्रतिष्ठा कार्यक्रम केवळ निमंत्रण असून ट्रस्टने स्वतः काही निवडक पाहुण्यांनाच आमंत्रणे पाठवली असल्याचा खुलासा केला.