For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोविंदाचा पुत्र करणार बॉलिवूडमध्ये एंट्री

06:22 AM Dec 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोविंदाचा पुत्र करणार बॉलिवूडमध्ये एंट्री
Advertisement

गोविंदा यांनी मागील 35 वर्षांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आजही गोविंदा यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जाते. आता त्यांचा पुत्र यशर्वधन आहुजा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यशवर्धन आहुजा हा साई राजेश या दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. यशवर्धनने या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. या चित्रपटाची निर्मिती मधु मंटेना, अल्लू अरविंद आणि एसकेएन फिल्म्सकडून केली जाणार आहे. चित्रपटातील नायिकेचे नाव अद्याप समोर आलेले नाही. परंतु नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याचे समजते. याकरता कास्टिंग डायरेक्टरकडून ऑडिशन घेतली जात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.