For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरगुती धार्मिक कार्यासाठी बिहारचे राज्यपाल आले दोडामार्गात !

05:58 PM Apr 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
घरगुती धार्मिक कार्यासाठी बिहारचे राज्यपाल आले दोडामार्गात
Advertisement

दोडामार्ग - वार्ताहर

Advertisement

दोडामार्ग येथे एका घरगुती धार्मिक कार्यासाठी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे शुक्रवारी दाखल‌ झाले. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.कसई - दोडामार्ग मधील सोलदेवाडी येथे अनंत गजानन मराठे यांच्याकडे शुक्रवारी एक व्रतबंध संस्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आपली खास उपस्थिती लावली. हा त्यांचा खाजगी दौरा होता. या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले होते. शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच नगरपंचायतीचा अग्निशमन बंब, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली. राज्यपाल आर्लेकर यांचे गोव्याहून दोडामार्गच्या दिशेने शुक्रवारी दुपारी १ वा.च्या सुमारास आगमन झाले. अनंत मराठे यांच्या घरगुती धार्मिक कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रम आटोपताच ते गोव्याच्या दिशेने रवाना झाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.