राज्यपालांकडून जिल्ह्याची कल चाचणी ! शासकीय अधिकारी, सत्ताधारी व विरोधी नेत्यांबरोबर चर्चा
मागण्या, तक्रारींचा पाऊस
टिम तरूण भारत सांगली / मिरज
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी जिल्ह्याचा दौरा करून निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय आणि सामजिक स्थितीची चाचपणी केली. वरिष्ठ शासकीय अधिकारी, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते यांच्याशी चर्चेबरोबरच जिल्ह्याबद्दलची माहिती घेऊन राज्यपाल रवाना झाले. मात्र हा दौरा भाजपला राज्यात आणि जिल्ह्यात वातावरण अनुकूल आहे का? याची चाचणी करण्यासाठी असावा अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
लोकसभेत बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्यातील सामाजिक स्थिती काय आहे आाणि विकास कामांचा परिणाम कितपत झाला आहे, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या काय आहेत, जिल्हा जिल्ह्यात कोणत्या विषयावर चर्चा झडू शकते याची चाचपणी करण्यासाठी राज्यपाल सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर अचानक आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राजकीय पक्षांना दिलेल्या वेळातील फार कमी वेळ सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांना देऊन राज्यपालांनी विरोधी पक्षाच्या निवेदनांना आणि नेत्यांच्या चर्चेला आधिक वेळ दिला. प्रत्येक व्यक्तील दोन मुद्दे आणि प्रत्येक मुद्दा 45 सेकंदात मांडण्याचा सल्ला त्यांच्या प्रशासनाकडून देण्यात आला होता. विरोधी नेते मराठीत काय सांगत आहेत ते तामिळमध्ये भाषांतरित करून सांगण्याचे काम जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी केले. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या मागण्या राज्यपालांनी लिखित स्वरूपात पाठवून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
अमित शहांमुळे कोल्हापूर ऐवजी सांगली !
पुणे येथील दौऱ्यानंतर राज्यपालांचे प्रथम प्राधान्य हे कोल्हापूर होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा जाहीर झाला आणि त्यामध्ये राज्यपालांनी ठरवलेल्या तारखेलाच बुधवारी अमित शहा हे कोल्हापूरला येणार असल्याने राज्यपालांनी कोल्हापूर दौरा पुढे ढकलून सांगलीला प्राधान्य दिले.
राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा
निवडणूक आयोगाने इतर राज्यांवर महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम घाोषित केला नसल्याने आणि राज्यपाल अचानक साक्रिय झाल्याने राज्यातील निवडणुका पुढे जातात की काय? अशी चर्चा दिवसभर मिरजेत कार्यक्रमस्थळी होती. निवडणूक आयोग दोनच दिवसात पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट करणार असले तरी राज्यपालांच्या दौऱ्यामुळे मात्र राजकीय कार्यकर्त्यांनी ही राष्ट्रपती राजवटीची चाहूल असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
अधिकाऱ्यांची बैठक
शासकीय विश्रामगृह मिरज येथे राज्यपालांनी वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. राज्यपाल म्हणाले, जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधा होण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आराखडा तयार केल्यास शासन स्तरावरून सहकार्य मिळवणे सोयीचे होईल. भौतक विकासाबरोबर जनतेच्या आर्थिक विकासालाही चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरील लक्ष द्यावे, असे सांगितले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा, प्रकल्पांचा आढावा घेतला. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी तंतुवाद्य देऊन राज्यपालांचे स्वागत केले.
जिल्ह्याचा अपेक्षा, विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, उद्योजक, डॉक्टर, सी.ए., ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर विविध घटकाबरोबर चर्चा केली. त्यांच्या विकास विषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.
विमानतळ, उद्योग, एमआयडीसी निवेदनांचा पाऊस
लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ आदि उपस्थित होते. कांद्याचा अनिश्चित दर, निर्यातशुल्क आणि निर्यातबंदी, सामाजिक समीकरण करताना आरक्षणाचा मुद्दा आदिंसह जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित मुद्दे लोकप्रतिनधींनी मांडले. जिल्ह्यात उद्योग यावेत, आयटी पार्क, ग्रामीण भागात एमआयडीसी, दळणवळण सा†वधा, पुण्यासाठी इंटरसिटी ट्रेन सा†वधा, तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी विमानतळ व्हावे, संस्कृती संवर्धन व पर्यटनवाढीस चालना मिळावी, अशा अपेक्षा व्य‹ करण्यात आल्या.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सार्वजा†नक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, कायदा व सुव्यवस्था आा†द प्रमुख ा†वषयांसह उद्योग क्षेत्रातील पायाभूत सा†वधांचा ा†वकास, उद्योजकांच्या समस्या, पर्यटन ा†वकासासाठी सा†वधांचा ा†वकास, सा†हत्य, नाट्या, सामा†जक कार्य, का†ष, पर्यावरण, जलसंधारण आा†द विषयांतील मान्यवरांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.