For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारी शिमगोत्सव 26 पासून फोंड्याहून प्रारंभ होणार : 8 एप्रिल रोजी समारोप

02:47 PM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरकारी शिमगोत्सव 26 पासून फोंड्याहून प्रारंभ होणार   8 एप्रिल रोजी समारोप
Advertisement

पणजी : राज्यातील सरकारी पातळीवर शिमगेत्सवाला दि. 26 मार्च रोजी फोंड्याहून प्रारंभ होत आहे. दि. 8 एप्रिल रोजी कुंकळ्ळी आणि वाळपई येथे एकाच दिवशी होणाऱ्या मिरवणुकांनी समारोप होईल. यंदाच्या शिमगेत्सवात बक्षिसांची रक्कम वाढवलेली आहे. त्याचबरोबर आयोजकांना रात्री दहापर्यंत शिमगोत्सव मिरवणूक संपुष्टात आणा, असा आदेश सरकारने दिलेला आहे. यंदाच्या शिमगोत्सवावर लोकसभा निवडणुकीचे सावट असून आचारसंहिता लागू असल्याने अनेक आमदार व मंत्री यांना या उत्सवाकडे पाठ करावी लागणार आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी यंदाच्या शिमगेत्सवातील चित्ररथ आणि रोमटामेळ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांची रक्कम वाढवून दिली आहे. चित्ररथ स्पर्धेचे पहिले बक्षीस एक लाख रुपये, रोमटामेळसाठी 75 हजार ऊपयांचे पहिले बक्षीस राहील. वार्षिक पद्धतीनुसार फोंडा येथे शिगमोत्सावाला प्रारंभ होईल. पर्यटन खात्याने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार दि. 26 मार्च फोंडा, 27 कळंगुट, 28 सांखळी, 29 डिचोली, 30 पणजी, 31 पर्वरी, 1 एप्रिल पेडणे,  2 एप्रिल काणकोण, 3 एप्रिल वास्को, 4 शिरोडा, 5 कुडचडे, केपे धारबंदोडा 6, मडगाव, म्हापसा व सांगे 7,  आणि 8 एप्रिल रोजी कुंकळ्ळी आणि वाळपई शिगमोत्सवाच्या मिरवणुका होतील. देशातील विविध भागात राष्ट्रीय स्तरावर पर्यटन खात्याने या  उत्सवाचा प्रचार केलेला आहे. पणजीतील मिरवणूक 30 रोजी होईल. पर्यटन खात्याने कार्निव्हल मिरवणूक ज्या मार्गावरून होते तोच मार्ग म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर मार्ग मांडवी पुलाखालून ते कांपालपर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. यंदा प्रथमच पणजीतील मिरवणुकीचा मार्ग बदलला आहे. पर्यटन खात्याने ट्रॅव्हल अँड टुरिझम वर्ल्ड वर गोव्याच्या शिगमोत्सवाची माहिती पोचविलेली आहे. त्यामध्ये गोव्यात होणारे विविध कार्यक्रम यात घोडेमोडणी, झरमे येथील चोरोत्सव, चोडण येथील होमकुंड, काणकोण येथील शिशिरांनी इत्यादींचा समावेश त्यात केलेला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.