महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरकारी अधिकारीच ‘कमिशन एजंट’

12:38 PM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संदीप परब, अजित सतरकर,श्रीधर सतरकर सरकारी अधिकारी

Advertisement

फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंत गावस प्रकरणात माशेल येथील मध्यस्थ (एजंट) संदीप परबने केलेल्या गौप्यस्फोटात एकूण 44 जणांकडून घेतलेले सुमारे 3.88 कोटी रूपये दीपश्रीला सुपूर्द केल्याची तक्रार केली आहे. तक्रारदार हाच खुद्द सरकारी अधिकारी असल्याचे उघडकीस आले आहे. जलस्रोत खात्यात तारीवाडा माशेल येथील संदीप जगन्नाथ परब हा कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. तसेच ठकसेन पूजा नाईक प्रकरणात एजंट म्हणून वावरणारे मयत श्रीधर कांता सतरकर व अजित सतरकर हे दोघेही सरकारी अधिकारीच असल्याचा उलगडा झालेला आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी सद्या जॉब स्कॅमात कमिशन एजंट म्हणून वावरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Advertisement

सरकारी अधिकाऱ्यांना नेटवर्कमध्ये सामावून घेत ‘भुलभुलैया जॉब स्कॅम’ ठकसेन  दीपश्री सावंत व ठकसेन पूजा नाईक यांनी चालविले होते. बेरोजगारांना गंडविण्याचा धंदा मध्यस्थांच्या मदतीने चालविण्यात त्यांना या अशा सरकारी अधिकाऱ्यांमुळेच यश मिळत आले. अशा प्रक्रियेतून त्यांनी काहीजणांना सरकारी नोकरीमध्ये रूजू केल्याची शक्यताही नाकारता येत नाही. सद्यााच्या जॉब स्कॅमात वैद्यकीय चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, नावे शॉर्टलिस्ट करण्याची बनावट कागदपत्रे, बोगस अपॉईंमेट लेटर्स, वर्क आर्डर्स या ठकसेनांनी कशा मिळवल्या हा संशोधनाचा विषय आहे. ठकसेनाकडून खात्याचे संचालकाचा तसेच आरोग्यमंत्र्याच्या नावाचा वापर करून बेरोजगारांना गंडविण्याचे काम तडीस लावले जात होते. ठकसेनाचे गॉडफादर असल्याशिवाय ऐवढे मोठे धाडस करणे जोखमीचे काम आहे. त्यामुळे दीपश्री व पूजा यांच्या तीन महिन्याच्या मोबाईल संभाषणाची कसून चौकशी करून जॉब स्कॅम गुंतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे.

पंच, सरपंचाच्या सहभागामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढली 

दीपश्रीने नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कार्यकाळात आरोग्यमंत्र्याचे नाव वापरून वनखाते, नगर नियोजन खाते (टीसीपी), आरोग्य खात्यात ही सरकारी नोकर भरती करण्यात येणार असल्याचे आ़श्वासन देऊन एजंटामार्फत बेरोजरागांना जॉब स्कॅमच्या साखळीत अडकवले. ज्यांनी पैसे घेऊन दीपला दिले, त्यांच्या नावांच्या जाहीर झालेल्या यादीमध्ये काही सरपंचाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झालेले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना नोकरीसाठी पैशाचा वापर सर्रास होतोय असे या प्रकरणातून अधोरेखित होत आहे. त्या सरपंचाचे सुमारे रू.,58 लाख अडकल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. मात्र याप्रकरणी ससेमिरा नको म्हणून आपले सर्व पैसे परत मिळाल्याचा कांगवा त्यानी पोलिसांना दिलेल्या जबानीत देऊन तो मोकळा झालेला आहे.

 ठकसेन दीपश्रीला पाच दिवसाची कोठडी 

ठकसेन दीपश्री पाच दिवसाच्या रिमांडवर फोंडा पोलिस स्थानकाच्या कोठडीत आहे. तिची पोलीस कोठडी आज सोमवारी  संपत असून आज यावर फोंडा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोणती भूमिका घेतात यावर सर्वाचे लक्ष लागून राहिलेले आहे. पैसे देऊन नोकरी मिळवणाऱ्यामुळेच सरकारी खात्यात भ्रष्टाचारी वाढत आहे की काय ? असा सवालही आता गोमंतकीय उपस्थित करू लागले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article