शासकीय कार्यालयांनी आस्थापनेवरील वाहनांना एचएसआरपी बसवावी
प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांचे आवाहन
कोल्हापूर
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय विभागप्रमुखांनी आपल्या आस्थापनेवरील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ३० जून २०२५ पर्यंत नव्याने मुदतवाढ देऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचे शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने जिह्यातील सर्व शासकीय विभागप्रमुख यांनी त्यांच्या आस्थापनेवरील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याबाबतची कार्यवाही करणे आवश्यक आहे.
शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवून ३ संस्था, उत्पादकांची निवड केली आहे. त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांची ३ झोनमध्ये विभागणी केली असून प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर करीता रोझमेरिया सेफ्टी सिस्टम या उत्पादक संस्थेची नेमणूक केलेली आहे.
या उत्पादक संस्थेने झोननिहाय अधिकृत फिटमेट सेंटर्सची नियुक्ती केलेली आहे. सर्व शासकीय आस्थापनांनी https・/transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईमेंट घेऊन वाहनांवर एचएसआरपी बसविण्याची कार्यवाही करावी. जिह्यातील एका ठिकाणी किमान २५ किंवा २५ पेक्षा जास्त वाहन संख्या असलेल्या शासकीय कार्यालयांनी एचएसआरपी बसविण्यासाठी अर्ज केल्यास, त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंवा कार्यालयात संबंधित एजन्सीमार्फत कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क न आकारता एचएसआरपी बसविण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी भोर यांनी कळवले आहे.