For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

टोरंट पॉवर प्रकल्पावरून सरकारची कोंडी!

06:21 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
टोरंट पॉवर प्रकल्पावरून सरकारची कोंडी
Advertisement

रायगड जिह्यात कर्जत तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या ऊर्जा साठवण प्रकल्पावऊन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत विरोधक आणि पर्यावरण प्रेमींनी सरकारला घेरले आहे. या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या आरोपांचे खंडण करताना, कर्जत पंप स्टोरेज हा संपूर्णपणे पर्यावरण पुरक प्रकल्प असून विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम सुरू असल्याचा हल्लाबोल केला.

Advertisement

मनोज जरांगे पाटील यांनी ऑडीओ क्लीप व्हायरल करत केलेल्या  500 कोटींच्या आरोपानंतर सरकारमधील भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्येच जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच एमपीएससी, व्होटचोरी ज्ञानेश कुमार यांचा राजीनाम्याच्या मागणीचे आंदोलन, त्यानंतर आता टोरंट प्रकल्पावऊन विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

रायगड जिह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह करताना अस्पृश्य समाजाला या तलावाचे पाणी वापरण्याचा अधिकार दिला. मुंबईला लागून हा जिल्हा असल्याने मुंबई, ठाणे आणि त्यानंतर रायगडमध्ये असलेल्या नवी मुंबई शहराची निर्मिती झाली. नवी मुंबईच्या उभारणीसाठी पनवेल, उरण आणि परिसरातील जमिनी संपादित केल्या गेल्या. आपल्या जमिनीवर शहर उभी राहणार, उद्योग येणार, विकासाचे नवे पर्व येणार या आशेने येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्या जमिनींना योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे नेते दि.बा.पाटील यांनी आंदोलन केले. दि. बा. नी केलेल्या संघर्षामुळेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी संपूर्ण रायगड जिह्याने केली. लाखोंचे मोर्चे काढले, मात्र अद्याप या विमानतळाला पाटील यांचे नाव देण्यात आलेले नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, समुद्रमार्गे मोठा व्यापार मुंबई शेजारील नवी मुंबई, रायगड, न्हावाशेवा बंदरातून होत असल्याने अनेक प्रकल्प जे मुंबईत उभे राहू शकले नाहीत, ते रायगडमधील पनवेल, उरण या भागात गेले. तीस चाळीस वर्षापूवी येथे अनेक उद्योग येत असताना मोठ मोठी आंदोलने झाली. त्यात सेझचे आंदोलन ज्याचे नेतृत्व उल्का महाजन यांनी केले होते, रायगड जिल्हा आणि आंदोलन हे एक समीकरणच बनले होते. आता रायगड जिह्यात कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट

Advertisement

पॉवरच्या प्रकल्पावऊन जोरदार रणकंदन होताना दिसत आहे. या प्रकल्पासाठी वनविभागाकडून 600 एकर जागा टोरंटला दिली जाणार आहे, त्यात 150 एकर खाजगी जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 32 हजार झाडे तोडली जाणार आहेत, तर या प्रकल्पामुळे अडीच लाखाहून अधिक झाडांना धोका असल्याचे बोलले जात आहे. यामुळे कर्जत-भिमाशंकर भागातील पक्षी, वन्यजीव तसेच किटकांचा नैसर्गिक अधिवास नाहीसा होणार आहे, तर जंगलावर अवलंबून असलेले आदिवासी बांधव, नैसर्गिक जलस्त्रोत आणि नदीच्या प्रवाहावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरकार मात्र 30 हजार कोटींची गुंतवणूक तसेच 12 हजार मेगावॉट वीजनिर्मिती, पर्यायी 90 हजार नवी झाडे लावण्याचा दावा करत आहे. सध्या राज्यात एल निनोमुळे पाऊस कमी झाला आहे, परिणामी सर्व राज्ये दुष्काळाचा सामना करत आहेत. हा एल निनो अधिक तीव्र होणार असून, दुष्काळाच्या झळादेखील वाढणार आहेत, हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. वृक्षतोड पर्यायाने जैवविविधता तसेच पर्यावरणाचा ऱ्हास हे हवामान बदलाला कारणीभूत मानले जाते, तरीही महाराष्ट्रात भांडवलदारांच्या प्रकल्पासाठी सरकार आपली प्रतिष्ठा पणाला लावताना दिसते. विकासाच्या नावाखाली एखादा प्रकल्प जनतेच्या माथी मारणे सोपे असते परंतु त्या प्रकल्पाचे परिणाम जनतेला भोगावे लागणार असतील तर सरकारला त्याची उत्तरे द्यावीच लागतात. राज्यातील ज्या भागात उद्योगधंदे नाहीत, त्या भागात असे प्रकल्प का नेले जात नाहीत, राज्यातील सरकार हे खमके असेल तर चांगले प्रकल्प राज्यात येतात. सध्या राज्यातील तीन पक्षाच्या सरकारमध्येच ताळमेळ नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले. त्यातच टोरंट कंपनी गुजरातची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विनाशकारी प्रकल्प तुमच्या राज्यात करा असे विरोधक बोलू शकतात, सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत विरोधकांची ताकद कमी आहे. त्यातच एमपीएससी आंदोलन असो किंवा व्होटचोरी वऊन ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनात झेन-झी च्या बरोबर विरोधक सहभागी होताना दिसतात. मुठभर असलेल्या विरोधकांची सरकार दखल घेत नाही, विरोधक सरकारच्या विरोधात बोलत नाहीत, त्यामुळे जनतेच्या विधायक प्रश्नावर विद्यानंद बापट, संतोष पंडीत तसेच विवेकानंद पाटील सारखे लोक सरकारला जाब विचारताना दिसतात. टोरंट पॉवरच्या मुद्यावरून विरोधीपक्षातील आदित्य ठाकरे, रोहित पवार काँग्रेसचे नेते यांनी सरकारला धारेवर धरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 28 ऑक्टोबरला या प्रकल्पाविरोधात कर्जतमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. रायगड जिह्याचा कधी काळी आवाज राहिलेला शेतकरी कामगार पक्ष देखील या प्रकल्पाच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाव्य दौऱ्यात काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहे. स्थानिक लोकांना विश्वासात न घेता केंद्राने हा प्रकल्प राज्यावर लादल्याचा विरोधकांचा आरोप आहे. राज्य सरकार दिल्लीतून लादलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करते. आपली खुर्ची वाचवायची असेल तर राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिल्लीश्वरांची मर्जी सांभाळावी लागते, जे प्रकल्प दिल्लीश्वरांच्या फायद्याचे हिताचे आहेत. त्याला कितीही विरोध केला तरी, तो हाणून पाडतात. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन किती लोक या ट्रेनने प्रवास करणार माहित नाही, पण प्रकल्पाला विरोध असताना देखील आज जोरात काम सुरू आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.