For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी सरकारची मार्गदर्शक सूची

11:57 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी सरकारची मार्गदर्शक सूची
Advertisement

लहान मुलांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण सरकारसाठी चिंताजनक बाब

Advertisement

बेळगाव : भारत ही मधुमेहाची राजधानी होईल, असे भाकित वर्तविले जात असतानाच लहान मुलांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण ही सरकारसाठीसुद्धा चिंताजनक बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लहान मुलांमधील मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी प्रथमच मार्गदर्शक सूची तयार केली आहे. या अनुषंगाने आता जन्मलेल्या मुलांपासून 18 वर्षांपर्यंतच्या मुलांपर्यंत सर्व मुलांची मधुमेह तपासणी केली जाणार आहे.

या तपासणीमध्ये ज्या मुलांना मधुमेह असल्याचे आढळून येईल, त्यांच्यासाठी त्वरित ब्लड ग्लुकोज तपासणी आणि जिल्हा स्तरावर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये या सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत लवकर निदान व लवकर उपचार या सूत्रावर भर देण्यात आला आहे. जन्मत:च असलेला दोष, कमतरता, रोग आणि उशीर झाल्यास वाढणारी गुंतागुंत हे टाळण्यासाठी सरकारने लवकर निदानावर आणि विनामूल्य उपचारावर भर दिला आहे. यासाठी जिल्हा हॉस्पिटल म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलची मदत घेणारआहे..

Advertisement

बालवयात होणाऱ्या मधुमेहाबाबत त्वरित पावले उचलण्यासाठी सरकारने ‘4 टी’ महत्त्वाचे मानले आहेत. म्हणजेच टॉयलेट, थ्रस्टी, टायर्ड अँड थिनर याबाबत पालक आणि शिक्षकांनाही प्रशिक्षित केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मधुमेहाबाबत जागृती करण्यासाठी 144 पानांची मार्गदर्शक सूची तयार केली आहे. यामध्ये दवाखान्यात किंवा हॉस्पिटल्समध्ये घ्याव्या लागणाऱ्या उपचार पद्धतीबद्दल माहिती देण्यात आली असून कुटुंबातील सदस्य व काळजीवाहक यांनाही मार्गदर्शन करण्याबाबत तत्त्वे देण्यात आली आहेत.

Advertisement
Tags :

.