Good News: पंतप्रधान पीक विमा योजनेला शासनाची मुदतवाढ
पर्यायाने अनेक शेतकरी पिक विमा करु शकले नाहीत
सरवडे : खरीप हंगामातील पिकांसाठी शासनाने २०२५ मध्ये सुधारीत पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत होती. परंतु अनेक शेतकरी मुदतीत सहभागी न झाल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या योजनेला मुदतवाढ दिली आहे.
यामध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना १४ ऑगस्ट व कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत राहणार आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५ मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीकांसाठी राज्यात राबविण्यास २४ जून रोजी शासनाने मंजुरी दिली.
या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५ करिता शेतकऱ्यांना सहभागाची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ अशी निश्चित करण्यात
आलेली होती. परंतु शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक अडचणी आल्या. पर्यायाने अनेक शेतकरी पिक विमा करु शकले नाहीत.
त्यामुळे पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत होती. शेतकऱ्यांची अडचण व मागणी लक्षात घेऊन योजनेच्या सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५ मध्ये ऑ नलाईन विमा अर्ज भरण्यास बिगर कर्जदार शेतकऱ्यांना १४ व कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीत योजनेच्या कार्यवाही बाबत आवश्यक तरतूदीचे काटेकोर पालन करावे, योजनेच्या अंमलबजावणीतील
नैतिक धोके तसेच लाभार्थ्यांच्या चुकीच्या निवडीची जोखीम टाळण्याची कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी व कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीकडून मोहीम राबविण्यात यावी असे सूचित केले आहे.
जाचक अटी रद्द कराव्यात
"पीक विमा योजनेच्या जाचक अटी रद कराव्यात, तसेच विमा योजनेत सहभागी होण्याची मुवत वाढवावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत 'वै. तरुण भारत संवाव' ने मागणीचे वृत्त २ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केले होते. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक विमा योजनेला मुक्तवाढ विली आहे. त्यामुळे इच्छुक शेतकरी पीक विमा घेवू शकतात. हे विलासावायक आहे. त्याच प्रमाणे विम्यासाठी काही जाचक अटी आहेत त्या वेखील शिथील कराव्यात. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येईल."
- नंदकिशोर सुर्यवंशी, माजी संचालक, बिद्री साखर कारखाना