शासकिय कंत्राटदारांचे थकितबिलांसाठी धडक आंदोलन
थेट सार्वजनिक बांधकाम कार्यालयात घुसवली वाहने
कोल्हापूर
डंपर जेसीबी रोड रोलर घेऊन ठेकेदार थेट बांधकाम कार्यालयात घुसले. थकीतबिल तात्काळ मिळावीत यासाठी ठेकेदार आक्रमक झाले आहेत. राज्यभरात शासकीय काम करणाऱ्या ठेकेदारांची कोट्यावधीची बिल सरकारकडून थकीत आहेत. ही बिल तात्काळ मिळावीत, यासाठी आता ठेकेदार आक्रमक झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर अनोखे आंदोलन करण्यात आले. डंपर जेसीबी रोड रोलर यांसह अन्य बांधकाम साहित्य घेऊनच हे कंत्राटदार आंदोलनात उतरले आहेत. सोबतच टाळ वाजवत आणि भजन करत या कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं.
अचानक आलेल्या आंदोलकांनी आपली वाहन थेट सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या गेटच्या आत घुसवली.कोट्यावधीची थकीत बिल तात्काळ द्यावेत, अन्यथा एक मार्चपासून शासकीय काम बेमुदत बंद ठेवली जातील,असा इशारा देखील यावेळी आंदोलक कंत्राटदारांनी दिला आहे.
शासनाकडे ०३०४ या बजेटच्या कामाचे राज्यातील २७ हजार कोटी रुपयांचा निधी अडकलेला आहे. सहा ते सात महिने झाले एकही रुपया आमच्या ठेकेदारांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे ठेकेदार कोणाचेही पैसे देऊ शकत नाही आहे. देणेकरी, मटेरीयल सप्लायर, कामगार कोणाचेही पैसे देऊ शकलो नाही आहेत. ३१ मार्च जवळ आल्याने सर्वांची खाती एनपी व्हायच्य स्थितीत आलेली आहेत. ३० तारखेच्या आधीजर आमची बिल मंजूर होऊन रक्कम मिळाली नाही तर आम्ही महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन तर्फे अजून तीव्र आंदोलन करू. १ एप्रिलपासून राज्यातील सर्व कामे बंद करू असा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आला.