For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गातील शासकीय इमारती व पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

05:59 PM Oct 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गातील शासकीय इमारती व पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन
Advertisement

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत 'महाप्रीत' सोबत महत्त्वपूर्ण बैठक

Advertisement

छोटे उद्योग, कोल्ड स्टोरेजसाठीही सौर यंत्रणा होणार कार्यान्वित

कणकवली / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसवणे, तसेच मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी कोल्ड स्टोरेज यंत्रणा कार्यान्वित करणे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सदर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या महाप्रीत या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत त्यांना महत्त्वाच्या सूचनाही श्री राणे यांनी केल्या.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) या संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री नितेश राणे यांनी चर्चा केली.सौर ऊर्जेवरील या यंत्रणा कार्यान्वित करणे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांची कामे ‘महाप्रीत’च्या माध्यमातून जलद आणि दर्जेदार रित्या पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.या बैठकीस महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.