For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गौंडवाड म. गांधी हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

10:37 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
गौंडवाड म  गांधी हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश
Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक 

Advertisement

काकती विभागीय क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी हायस्कूल गौंडवाडच्या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे हायस्कूलचे व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे. क्रीडा स्पर्धेमधील सांघिक खेळात मुलींचा खो-खो संघ प्रथम क्रमांक, मुलांचा खो-खो संघ प्रथम, मुलींच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक 4×100 मी. आणि 4×400 मीटर धावणे प्रथम क्रमांक मिळविला. सदर स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये कोमल गंगाराम कुट्रे हिने मुलींच्या विभागामध्ये सर्वसाधारण वैयक्तिक विजेतेपद मिळविले. तसेच मुलींच्या गटामध्ये इच्छा विनायक पाटील हिने 100 मीटर धावणे प्र्रथम, 200 मी. धावणे, 3000 मी. धावणे, लांब उडी सर्वांमध्ये प्रथम क्रमांक, कोमल गंगाराम कुट्रे 400 मी. धावणे, 800 मी. धावणे प्रथम क्रमांक, सुवर्णा पाटील 800 मी. धावणे द्वितीय, ममता पाटील 1500 मी. धावणे प्रथम, नंदिनी पाटील 1500 मी. धावणे द्वितीय क्रमांक, मनश्री तुप्पद 3000 मी. धावणे द्वितीय क्रमांक, मनिषा भूगोलकर 5 कि. मी चालणे प्रथम क्रमांक, प्रतीक्षा पाटील व भक्ती पवार यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

Advertisement
Advertisement
Tags :

.