शेतात काम करताना विजेचा बसला शॉक
उमरगा :
शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागताच दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील बलसुर शिवारात गुरुवारी घडली आहे.
सविस्तर वृत असे की, बलसुर शिवारात बलसूर – कडदोरा – सास्तूर मार्गावरील एका तलावाजवळ शेतात पाणी देताना विजेचा शॉक लागून ही दुर्देवी घटना घडलीशॉ ज्वारिला पाणी देत असताना कडदोरा येथील व्यंकट राम बालकुंदे (वय ५९) व बलसूर येथील खुर्शिद अमीनसाब बडगिरे (वय ६७) या दोन शेतमजुरांचा विद्युत धक्क्याने जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे.घटनेची माहिती कळताच, महावितरनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत करुन घटनास्थळी पोहोचले. उमरगा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक रामहरी चाटे ,बिट अमलदार अनिल बोदमवाड आदिंनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.