Jayant Patil म्हणजे पळ काढणारा, रणांगणावर न टिकाणारा माणूस, Padalkar यांनी Padalkar यांची बोचरी टीका
दिवा विझताना मोठा होतो तशी जयंत पाटील यांची अवस्था झाली आहे
कोल्हापूर : सध्या जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या संकेताच्या बातम्या समोर येत आहे. तूर्तास थांबण्याचा शरद पवारांनी सल्ला दिला असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, आता जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना जंयत पाटलांवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे.
जयंतराव राजकारणातला संपलेला विषय आहेत. त्यामुळे सतत जाळ घालून हा विषय कितीही मोठा करण्याचा प्रयत्न केला तरी काय उपयोग होणार नाही. दिवा विझताना मोठा होतो तशी जयंत पाटील यांची अवस्था झाली आहे. पाटील हे पळ काढणारा माणूस असून रणांगणावर टिकाणारा व्यक्ती नाही. राजकारणात अनुकंपावर भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं लढाऊ बाणा नसल्याची खोचक टीका पडळकर यांनी केली आहे.
कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जयंत पाटील यांच्यावर गंभीर टीका केली आहे. ते म्हणाले, अख्ख्या राजकीय कारकिर्दीत ते कधी जेलमध्ये गेले नाहीत किंवा कोणताही मोठा प्रोजेक्ट सांगलीसाठी आणला नाही. इतके वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात कॅबिनेट मंत्री म्हणून राहिले आहेत, परंतु त्यांना काही कामच करता आले नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिले तर देवेंद्र फडणवीसांचे हजारो प्रोजेक्ट सांगता येतील. सायकल पंक्चर झाल्यानंतर पंक्चर, काढता येते मात्र टायरच फुटल्यानंतर टायर पूर्णपणे बदलावा लागतो. तशी अवस्था जयंत पाटील यांची झाली आहे.