गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक
ब्ल्यू ओरिजिन कॅप्सूलद्वारे 6 जणांकडून अंतराळाची सैर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
गोपी थोटाकुरा हे पहिले भारतीय अंतराळ पर्यटक ठरले आहेत. उद्योजक आणि वैमानिक असलेल्या गोपी यांनी ब्ल्यू ओरिजिनच्या खासगी अंतराळयानातून उ•ाण केले. ब्ल्यू ओरिजिन ही अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची कंपनी आहे. गोपी यांना 5 अन्य सहप्रवाशांसोबत न्यू शेपर्ड-25 मोहिमेसाठी निवडण्यात आले होते.
ब्ल्यू ओरिजिनचे 7 वे मानवयुक्त उ•ाण एनएस-25 रविवारी सकाळी पश्चिम टेक्सासमधून प्रक्षेपित झाले. गोपी यांच्यासोबत चालक दलाच्या अन्य 5 सदस्यांमध्ये मेसन एंजेल, सिल्वेन शिरोन, केनेथे एल. हेस, कॅरोल स्कालर आणि अमेरिकेच्या वायुदलाचे माजी कॅप्टन एड ड्वाइट सामील होते. मोहिमेदरम्यान चालक दलाने ध्वनीच्या वेगापेक्षा तीनपट अधिक वेगाने प्रवास केला आहे.
रॉकेटने कॅप्सूलला कार्मन लाइनच्या पुढे पोहोचविले, जी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवरील क्षेत्र आहे. या क्षेत्राबाहेर अंतराळाचा प्रारंभ होतो. अंतराळ पर्यटक सुमारे 10 मिनिटांपर्यंत अंतराळात राहिले. उ•ाणादरम्यान प्रवाशांना काही मिनिटांसाठी शून्य गुरुत्वाकर्षण आणि केबिनच्या खिडक्यांमधून पृथ्वीच्या अद्भूत दृश्यांचा अनुभव घेता आला. यानंतर अंतराळयान पृथ्वीवर सुखरुप परतले आहे.
आंध्रप्रदेशमध्ये जन्मलेले गोपी यांनी आंतरराष्ट्रीय मेडिकल जेट पायलट म्हणून काम केले आहे. त्यांनी हर्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक जागतिक स्तराची आरोग्य कंपनी प्रिझर्व्ह लाइफ कॉर्पची स्थापना केली आहे.