For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गूगलने एआय चिप्स पाठवली अंतराळात

06:27 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
गूगलने एआय चिप्स पाठवली अंतराळात
Advertisement

प्रोजेक्ट सनकॅचर एक वर्ष चालणार

Advertisement

वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया

गूगलने पहिल्यांदाच आपल्या एआय चिप्स अंतराळात पाठवल्या आहेत. ‘प्रोजेक्ट सनकॅचर’ अंतर्गत कंपनीने आपल्या चार टेन्सर प्रोसेसिंग युनिट (टीपीयू) एआय चिप्स अंतराळात पाठवल्या. रेफ्रिजरेटरच्या आकाराचा हा प्रोटोटाइप उपग्रह कॅलिफोर्नियातील वँडेनबर्ग येथून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. सूर्यप्रकाशावर (सौर ऊर्जेवर) चालणारी भविष्यातील एआय डेटा सेंटर्स अंतराळात कार्यरत राहू शकतात की नाही, हे तपासणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. हे प्रक्षेपण या प्रकल्पाची पहिली कक्षीय चाचणी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.