‘गुगल पिक्सेल 11’ स्मार्टफोन लाँच
किंमत 89,999 पासून सुरु : एआय फिचर्स, कॉल ट्रान्सलेशनची प्रक्रिया विना इंटरनेट शक्य
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गुगलने ‘मेड बाय गुगल’ कार्यक्रमात पिक्सेल 11 स्मार्टफोनची आवृत्ती सादर केली आहे. या आवृत्तीमध्ये गुगल पिक्सेल 11, पिक्सेल प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल आणि पिक्सेल 11 प्रो फोल्ड यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, पिक्सेल स्मार्टवॉच आणि स्मार्ट टॅग्ससारखी वेअरेबल उपकरणेही सादर करण्यात आली. स्मार्टफोनच्या किमती 89,999 पासून सुरू होतात. गुगल पिक्सेल 11 सिरीजचे स्मार्टफोन हे जगातील असे पहिले फोन आहेत जे इंटरनेट कनेक्शनशिवाय एआय फिचर्स आणि व्हॉइस कॉल ट्रान्सलेशनची प्रक्रिया करू शकतात. याचा अर्थ असा की, पूर्ण गोपनीयतेसाठी फोनमधील एआय फीचर्स क्लाउड किंवा इंटरनेट सर्व्हरवर अवलंबून नसतात; सर्व डेटा थेट डिव्हाइसवरच (स्थानिक पातळीवर) प्रोसेस केला जातो.
लाँच ऑफर: 7,000 चा इन्स्टंट कॅशबॅक
गुगल पिक्सेल 11 च्या खरेदीवर 7,000 चा इन्स्टंट कॅशबॅक आणि 9,000 ची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे, ज्यामुळे एकूण 16,000 ची बचत होऊ शकते.
7 वर्षांचे अपडेट्स, अनेक फीचर्स
गुगल आपल्या फोनसाठी 7 वर्षांपर्यंत (2033 पर्यंत) सपोर्ट देणार आहे. यामध्ये ओएस अपडेट्स, सुरक्षा अपडेट्स, नवीन फीचर्स आणि एआय नवकल्पनांचा समावेश आहे. पिक्सेल आवृत्तीचे फोन अनेक प्रकारच्या एआय फीचर्सने सुसज्ज आहेत.
11 सिरीजची प्रमुख एआय वैशिष्ट्यो:
ऑन-डिव्हाइस जनरेटिव्ह हा फोन इंटरनेट कनेक्शनशिवायही सर्व एआय कार्ये जलद गतीने आणि पूर्ण गोपनीयतेसह पूर्ण करू शकतो.
मॅजिक कॅप्चर: हे प्रगत कॅमेरा वैशिष्ट्या तुम्हाला एकाचवेळी उच्च-गुणवत्तेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची आणि फोटो काढण्याची सुविधा देते.
ऑफलाइन व्हॉइस ट्रान्सलेशन: हे इंटरनेटशिवायही, लाईव्ह कॉल दरम्यान दोन्ही बाजूंच्या संभाषणाचे त्वरित दुसऱ्या भाषेत भाषांतर करू शकते.
स्मार्ट एआय एडिटिंग: फोटोंमधून अनावश्यक वस्तू काढून टाकण्यासाठी, पार्श्वभूमी बदलण्यासाठी आणि अस्पष्ट प्रतिमा अधिक स्पष्ट करण्यासाठी प्रगत एआय साधने उपलब्ध आहेत.
नेक्स्ट-जेन व्हॉइस असिस्टंट: गूगलचा जेमिनी एआय असिस्टंट आता तुमच्या आज्ञा पूर्वीपेक्षा अधिक मानवाप्रमाणे समजून घेतो आणि सहजतेने प्रतिसाद देतो.