For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुगल अँड्रॉईड युजर्सना मिळणार 7 नवीन फिचर्सची भेट

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुगल अँड्रॉईड युजर्सना मिळणार 7 नवीन फिचर्सची भेट
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

गुगल आता आपल्या ग्राहकांना मोठी भेट देणार आहे. अँड्रॉइड उपकरणांना गुगलकडून नवीन अपडेटची माहिती देण्यात आली आहे. गुगल अँड्रॉईड यूजर्सना 7 नवीन फीचर्स देणार आहे. गुगल अँड्रॉइड यूजर्सना जे पहिले फीचर देणार आहे ते मेसेजशी संबंधित आहे. मेसेज पाठवल्यानंतरही तो डिलीट करण्याचा पर्याय वापरकर्त्यांना मिळेल. एवढेच नाही तर 15 मिनिटांत तुम्ही मेसेज एडिट करू शकता. दुसरे वैशिष्ट्या हॉटस्पॉटशी संबंधित आहे. वापरकर्ते त्यांच्या फोनच्या हॉटस्पॉटशी  अँड्रॉइड टॅबलेट सहजपणे कनेक्ट करू शकतील. या नवीन फीचरनंतर हॉटस्पॉट फक्त एका टॅपनंतर कनेक्ट होईल. याशिवाय वापरकर्त्यांना स्विच करण्याचा पर्याय देखील मिळेल. तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये, वापरकर्त्यांना गुगल होम भेट देण्याची सुविधा आहे. म्हणजेच फोनच्या होम क्रीनवर वापरलेली सर्व स्मार्ट उपकरणे तुम्ही व्यवस्थापित करू शकणार आहे. याशिवाय चौथ्या फीचरमध्ये गुगल तुम्हाला डिजिटल कार की चा पर्याय देईल. म्हणजेच तुम्ही तुमच्या फोनवरूनच तुमची कार नियंत्रित करू शकाल. याद्वारे तुम्ही तुमची कार अनलॉक करून सुरू करू शकाल. पाचव्या फीचरमध्ये युजर्सना इमोजी तयार करण्याचा पर्यायही मिळेल. वापरकर्ते त्यांना हवे तेव्हा नवीन इमोजी तयार करू शकतात किंवा त्यांना हवे असल्यास ते दोन इमोजी एकत्र करून नवीन इमोजी देखील तयार करू शकतात. सहाव्या फीचरमध्ये तुम्हाला तुमच्या स्मार्टवॉचद्वारे अनेक सुविधा मिळतील.

Advertisement
Advertisement
Tags :

.