For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ.प्रभाकर कोरे यांच्याकडून नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट

11:29 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉ प्रभाकर कोरे यांच्याकडून नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट
Advertisement

अथणी तालुक्यातील कामे मार्गी लावण्याची विनंती

Advertisement

बेळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली. तिसऱ्यांदा मंत्रिपद स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अथणी तालुक्यातील मुरगुंडीपासून कागवाड, चिकोडी, गोटूरपर्यंत 87 किलोमीटरच्या 2,811.69 कोटी रुपये खर्चाच्या चौपदरी महामार्गाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. शिरगुप्पी व अंकली येथे उड्डाणपूल मंजूर केल्याबद्दल नितीन गडकरी यांचे अभिनंदन करण्यात आले असून तुमच्या कारकिर्दीतच ही योजना पूर्ण करण्याची विनंती प्रभाकर कोरे यांनी केली. चौपदरी महामार्ग हे अनेक दिवसांचे स्वप्न होते. त्यामुळे व्यापार-उद्योग वाढण्याबरोबरच दैनंदिन वाहतुकीसाठीही अनुकूल ठरणार आहे. इथेनॉलच्या वापरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक इथेनॉल प्रकल्प उभारण्याची विनंती केंद्रीय मंत्र्यांना करण्यात आली. यावेळी केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.