For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिरलोटेतून उभ्या ट्रकचा पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

01:35 PM Apr 09, 2025 IST | Radhika Patil
पिरलोटेतून उभ्या ट्रकचा पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास
Advertisement

खेड :

Advertisement

तालुक्यातील पिरलोटे येथील दशमेष ट्रान्स्पोर्ट कार्यालयासमोरील आवारात उभ्या केलेल्या ट्रकचे टायर, बॅटऱ्या, डिझेलसह इतर साहित्य असा 1 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. अज्ञात चोरट्यावर सोमवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत योगेश सतीश मपारा (रा. महाडनाका-खेड) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या मालकीचा आयशर ट्रक (एमएच. 08 एपी. 8979) कार्यालयासमोरील आवारात उभा करण्यात आला होता. या ट्रकचे जे. जे. कंपनीचे 6 टायर, 6 पोलादी डिस्क एक्साईड कंपनीच्या दोन बॅटऱ्या व 50 लिटर डिझेल असा 1 लाख 87 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.