For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कोल्हापूर–पुणे महामार्गावर मालवाहतूक ट्रक पलटी; वाहतूक विस्कळीत

01:47 PM Jan 07, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापूर–पुणे महामार्गावर मालवाहतूक ट्रक पलटी  वाहतूक विस्कळीत
Advertisement

                   टोप गावच्या हद्दीत ट्रकचा अपघात; चालक-क्लिनर जखमी

Advertisement

पुलाची शिरोली : कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी मालवाहतूक ट्रकचा ताबा सुटल्याने तो महामार्गावरच पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हा मालवाहतूक ट्रक काजूचे टरफले भरलेली पोती घेऊन कोल्हापूरकडून पुण्याकडे जात होता. टोप येथील कासारवाडी फाट्याजवळ आल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक दुभाजकाला धडकून रस्त्याच्या मधोमध आडवा झाला.

Advertisement

वाहतूक काही काळ विस्कळीतट्रक पलटी झाल्यामुळे त्यातील माल रस्त्यावर विखुरला गेला. ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याचा त्रास औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार, विद्यार्थी, तसेच अवजड वाहतूक चालक व स्थानिकांना सोसावा लागला.याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि सपोनी सुनील गायकवाड व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला केला. त्यानंतर एकेरी वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली

Advertisement
Tags :

.