For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News : शिवडे येथे कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारा मालट्रक जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान

05:54 PM Feb 02, 2026 IST | NEETA POTDAR
karad news   शिवडे येथे कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारा मालट्रक जळून खाक  लाखो रुपयांचे नुकसान
Advertisement

                                       पहाटे उंब्रजच्या ढाब्यावर आग

Advertisement

उंब्रज : आशियाई महामार्गावर शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत असलेल्या श्री गणेशा ढाब्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मालट्रकला अचानक आग लागून तो जळून खाक झाला. ही घटना रविवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत ट्रकमधील कापडाचा साठा जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनबर श्री गणेशा ढाब्यासमोर मालट्रक थांबविण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास ट्रकमधून अचानक धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात कापड असल्याने काही क्षणांतच

Advertisement

आग भडकली आणि संपूर्ण ट्रक आगीच्या विळख्यात सापडला.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला
होता.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याप्रकरणी उंब्रज पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.