कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खड्डे सोडले अन् चांगल्या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण

04:30 PM Feb 15, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली :

Advertisement

सांगली महापालिकेच्या टक्केवारीची चर्चा जोरदार सुरू असतानाच आता महापालिकेकडून अजब प्रकार समोर आला आहे. ती म्हणजे चांगले डांबरीकरण असणारे रस्तेच पुन्हा हांबरीकरण करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत महापालिकेच्या प्रशासनाला विचारणा केली असता प्रशासनांकडुन मात्र मौन बाळगणे ठेवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टक्केवारीसाठी हे रस्ते केले जात असल्याचा विरोधकांकडून दावा केला जात आहे. आता आयुक्तांनीच खुलासा करण्याची गरज आहे. सांगलीतील बाजारपेठ आणि वाहतुकीचे मुख्य रस्ते चांगल्या पध्दतीने डांबरीकरण करण्यात आले होते. पण हे रस्ते पुन्हा एकदा डांबरीकरणाचा घाट महापालिकेकडून घालण्यात आला आहे. याचा जाब काठी नागरिकांनी बेट ठेकेदाराला विचारला असता ठेकेदारांने याला आपण उत्तर देवू शकत नाही. याची विचारणा प्रशासनाकडे करावी, असे उलट उत्तर दिले. त्यामुळे महापालिकेकडून  निधीची कशाही पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे याचे हे मोठे उदाहरण आहे.

Advertisement

टक्केवारीसाठीच हे पुन्हा रस्ते केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ज्या रस्त्यावर खड़े पहले त्या रस्त्यावरून नागरिकांना चालत जाताही येत नाही असे रस्ते करण्यासाठी मात्र महापालिकेकडे निधी नाही पण चांगले रस्ते डांबरीकरण करण्यासाठी निधी कसा उपलब्ध झाला असा सवाल करण्यात येत आहे.

सांगलीतील हरभटरोड तसेच जुना स्टेशन रोह, एस.टी स्टँडजवळील रस्ता है रस्ते काही दिवसापुर्वीच डांबरीकरण केले होते. तसेच या रस्त्यावर कोठेही खड्डे आढळून येत नव्हते पण हेच रस्ते प्राधान्याने या ठेकेदारांकडुन करण्यात येत आहेत. याचे कारण काय आहे याबाबत सांगलीकर अचंबित झाले आहेत. चांगला हरभट रस्ता पुन्हा एकदा डांबरीकरण करत असतानाच याठिकाणी असणाऱ्या व्यापाऱ्यांनी विचारणा केली होती त्यावेळी ठेकेदारांकडुन या व्यापाऱ्यांना आम्हाला काहीही माहिती नाही, अशी उलट उत्तरे दिली होती. महापालिकेकडून याबाबत कोणताही खुलासा देण्यात आला नाही. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणामागे कोण आहे आणि कोणाची टक्केवारीसाठी काढण्यासाठी हे सुरू आहे या चर्चेला उधाण आले आहे. 

गुरूवारी सांगली एस. टी. स्टॅह रस्त्यावर एका ठेकेदारांकडून डांबरीकरण करण्यात येत होते. याचा जाब माजी उपमहापौराने विचारला त्यावेळी त्या उपमहापौर आणि त्या ठेकेदार पुत्रामध्ये वादावादी झाली आणि यातूनच उपमहापौरांनी ठेकेदार पुत्राला चांगलीच लगावली. त्यामुळे याची चर्चा सर्व महापालिका क्षेत्रात सुरू झाली आहे. याचे कारणही तसेच आहे. डी निविदा मॅनेज करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या निविदा मॅनेजमुळेच ही अशी कामे केली जात आहेत. त्यामुळे या कामांचा दर्जा काय असाही प्रश्न निर्माण होत आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article