For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृणाल हेब्बाळकरांना चांगला प्रतिसाद

10:40 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
मृणाल हेब्बाळकरांना चांगला प्रतिसाद
Advertisement

आमदार महांतेश कौजलगी : बैलहोंगल मतदारसंघात प्रचार

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना मतदारांतून मिळणारा प्रतिसाद त्यांच्या विजयाचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी केले. बैलहोंगल येथे आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. बुडरकट्टी, गोवनकोप्प, दोडवाड, करीकट्टी आदी गावांमध्ये मंत्री हेब्बाळकर, उमेदवार मृणाल हेब्बाळकर व आमदार महांतेश कौजलगी यांनी प्रचार केला. मृणाल हेब्बाळकर योग्य व्यक्ती आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना सत्तेचा मोह आहे. मुख्यमंत्री यासह विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. संधिसाधू राजकारण्यांना मतदारांनी दूर ठेवावे. बेळगावची जनता त्यांना कदापिही स्वीकारणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवरुद्रप्पा हट्टीहोळी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष शंकरगौडा पाटील, जिल्हा युवा अध्यक्ष कार्तिक पाटील, महांतेश व•ाrकोप्प, विठ्ठल काळी, श्रीशैल वाली, इराप्पा हत्तीगट्टी, महादेवी बोडकी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.