For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यजमान इंग्लंडला विंडीजचे चोख प्रत्युत्तर

06:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
यजमान इंग्लंडला विंडीजचे चोख प्रत्युत्तर
Advertisement

पहिली कसोटी,दुसरा दिवस : इंग्लंड प. डाव 416, विंडीज प. डाव 3 बाद 212, अॅथनेज, हॉज यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था /नॉटींगहॅम

येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत विंडीजने यजमान इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 416 धावांचा डोंगर केल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात चहापानापर्यंत 52 षटकात 3 बाद 212 धावा जमविल्या. विंडीजतर्फे अॅथनेझ आणि केव्हम हॉज यांनी नाबाद अर्धशतके नोंदवित चौथ्या गड्यासाठी अभेद्य 128 धावांची भागिदारी केली आहे.

Advertisement

इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये ऑली पोपने 167 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह 121, डकेटने 59 चेंडूत 14 चौकारांसह 71, ब्रुकने 1 षटकार, 5 चौकारांसह 36, कर्णधार स्टोक्सने 104 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 69 धावा झळकाविल्या. जेमी स्मिथने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 36 तर वोक्सने 48 चेंडूत 3 चौकारांसह 37 धावा जमविल्या. 88.3 षटकात इंग्लंडचा पहिला डाव गुरुवारी खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर 416 धावांवर संपुष्टात आला. विंडीजतर्फे सिल्स, सिंक्लेअर, हॉज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. अल्झारी जोसेफने 98 धावांत 3 तर शमार जोसेफने 1 गडी बाद केला.

शुक्रवारी विंडीजने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरुवात केली. कर्णधार ब्रेथवेट आणि लुईस यांनी पहिल्या गड्यासाठी 15 षटकात 53 धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या बशीरने लुईसला झेलबाद केले. त्याने 41 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या. या जोडीने अर्धशतकी भागिदारी 89 चेंडूत नोंदविली. यानंतर विंडीजचे 2 फलंदाज झटपट बाद झाले. इंग्लंडच्या अॅटकिनसनने ब्रेथवेटला बाद केले. त्याने 72 चेंडूत 8 चौकारांसह 48 धावा जमविल्या.

Advertisement
Tags :

.