बिडीतील क्रीडा स्पर्धेला स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद
नंदगड : भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र बेळगाव, कर्नाटक ग्रामीण विकास संघ कामशिनकोप, सरकारी प्रथम दर्जा कॉलेज बिडी यांच्या आश्रयाखाली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बिडी येथील सरकारी प्रथम दर्जा कॉलेजमध्ये झाल्या. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य नासीर शअहमद जंगुबाई होते. या कार्यक्रमाला बिडी ग्रामपंचायत अध्यक्ष संतोष काशीलकर, डॉ. मंजुळा सौंदत्ती, नागेंद्र चौगुला, केदारलिंग शंभोजी, लक्ष्मण बस्तवाड, रुद्रगौडा पाटील, डॉ. देवराज कॉलेज विकास समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते. आमदार विठ्ठल हलगेकर यावेळी बोलताना म्हणाले, युवकांनी क्रीडा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात भाग घ्यावा. दररोज योगाचा अभ्यास करावा, त्यामुळे युवकांचे शरीर सुदृढ होते. युवक सुदृढ राहिले तर देश सुदृढ व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी त्याचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे. येथे हॉलीबॉल, खो-खो, रनिंग, बॅडमिंटन, कबड्डी तसेच अन्य खेळाच्या स्पर्धा पार पडल्या.