दिल्ली ओपन बुद्धिबळ : भारतीय ग्रँडमास्टर्सकडून चांगली कामगिरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली इंटरनॅशनल ओपनमध्ये भारतीय ग्रँडमास्टर्सनी चांगली कामगिरी घडविलेली असून भारताचा अव्वल मानांकित ग्रँडमास्टर नारायणन एस. एल. याने सोमवारी येथे झालेल्या चौथ्या फेरीत व्हिएतनामचा ग्रँडमास्टर न्गुयेन डुक होआवर दमदार विजय मिळवला. याशिवाय दिप्तप्यन घोष आणि इतर दोन देशी ग्रँडमास्टर्सनीही विजय प्राप्त करण्यात यश मिळविले.
भारताच्या दमदार कामगिरीत भर घालत इंटरनॅशनल मास्टर दिनेश शर्मा आणि इंटरनॅशनल मास्टर हर्ष सुरेश यांनी महत्त्वाचे विजय मिळवले, तर ग्रँडमास्टर आदित्य एस. सामंतने आणखी एक दमदार विजय मिळवत सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवली आणि स्वत:ला स्पर्धेत टिकवून ठेवले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर मॅन्युएल पेट्रोस्यान, ग्रँडमास्टर मिहेल निकितेंको, ग्रँडमास्टर मामिकोन घारिब्यान, ग्रँडमास्टर बोरिस सावचेन्को आणि ग्रँडमास्टर लुका पैचाडझे यांनीही आत्मविश्वासपूर्ण कामगिरीसह आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली.
या दिवशीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यांत काही महत्त्वाचे सामने बरोबरीत देखील सुटले. यात ग्रँडमास्टर अलेक्सेज अलेक्झांद्रोव्ह विऊद्ध ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमन आणि इंटरनॅशनल मास्टर अऊण्यक घोष विऊद्ध ग्रँडमास्टर मिकुलस माणिक यांचा समावेश राहिला. बिव्होर अडाकनेही उल्लेखनीय कामगिरी करत ग्रँडमास्टर पंतसुलिया लेवनला बरोबरीत रोखले.
आता 21 व्या वर्षात प्रवेश केलेली दिल्ली इंटरनॅशनल ओपन ही आशियातील सर्वांत मोठी क्लासिकल स्वरूपातील खुली बुद्धिबळ स्पर्धा असून 24 ग्रँडमास्टर्ससह 20 हून अधिक देशांतील 2,500 हून अधिक खेळाडू त्यात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत विक्रमी 1.21 कोटी ऊपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.