For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोंगलपूर्वी तामिळनाडू सरकारकडून खूशखबर

06:24 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोंगलपूर्वी तामिळनाडू सरकारकडून खूशखबर
Advertisement

लोकांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडू सरकारने पोंगलनिमित्त लोकांना खूशखबर दिली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पोंगलनिमित्त लोकांना एक हजार रुपयांची रक्कम भेट म्हणून प्रदान करण्याची घोषण केली आहे. पोंगलचा सण यावेळी 15 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे.

Advertisement

सणापूर्वी केंद्र अणि राज्य सरकारचे कर्मचारी, प्राप्तिकरदाते, सार्वजनिक उद्योगांमध्ये कार्यरत लोक वगळून सर्व लोकांना सणापूर्वी रास्त भावाच्या दुकानांच्या माध्यमातून पोंगलसाठी भेट म्हणून एक हजार रुपये रोख देण्यात येतील असे राज्य सरकारने सांगितले आहे.

सरकारने पोंगल गिफ्ट हँपरची देखील घोषणा केली आहे. यात एक किलो तांदूळ आणि साखर सामील आहे. तसेच सरकारने गिफ्ट हँपरसोबत धोतर आणि साडीही मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने कलैगनार मगलिन उरीमाई थित्तम योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारे एक हजार रुपये पोंगल उत्सवाच्या 5 दिवसांपूर्वी म्हणजेच 10 जानेवारी रोजी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे  1.15 कोटी महिलांना थेट लाभ होणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

Advertisement
Tags :

.