For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेन संघासाठी आनंदाची बातमी

06:08 AM Jun 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्पेन संघासाठी आनंदाची बातमी
Advertisement

यामाल आणि निको यांचा पूर्ण सरावात सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था, टेनेसी (अमेरिका)

स्पेनच्या फिफा विश्व़चषक मोहिमेला मोठा दिलासा मिळाला आहे. संघाच्या आक्रमक फळीतील अत्यंत महत्त्वाचे खेळाडू असलेल्या लामिन यामाल आणि निको विल्यम्स यांनी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सराव सुरू केला आहे. 15 जून रोजी केप वर्दे विरुद्ध होणाऱ्या सलामीच्या सामन्यात या दोघांचा सहभाग अनिश्चित मानला जात होता. मात्र टेनेसी येथील बेस कॅम्पवर त्यांच्या उपस्थितीमुळे, संघाच्या जर्सीवर दुसरे स्टार (दुसरे विजेतेपद) मिळवण्याच्या लढाईसाठी ते पहिल्या सामन्यापासून सज्ज होऊ शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे.

Advertisement

गोल्ड डॉट कॉमच्या माहितीनुसार, गुरुवारी टेनेसीमधील चट्टानूगा येथे यामाल आणि विल्यम्स हे दोघेही पूर्ण जोमाने सराव करताना दिसले. दुखापतीमुळे हे दोघे आणि व्हिक्टर मुनोज सोमवारी पेरुविरुद्धच्या अंतिम सराव सामन्याला मुकले होते. संघातील इतर खेळाडूंना या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मात्र या तिघांनी संघाच्या प्रशिक्षण केंद्रावरच आपल्या दुखापतीतून सावरण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली.

Advertisement
Tags :

.