For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुड न्यूज! दसरा-दिवाळीत खाद्यतेल दरात घसरण होणार; आणखीन दहा ते पंधरा रुपयांनी दर उतरण्याची शक्यता

03:10 PM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुड न्यूज  दसरा दिवाळीत खाद्यतेल दरात घसरण होणार  आणखीन दहा ते पंधरा रुपयांनी दर उतरण्याची शक्यता
Advertisement

विद्याधर पिंपळे
कोल्हापूर: महागाईच्या काळात व सणाच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात कपात होणार आहे. या आठवड्यात खाद्य तेल किलोमागे पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. दसरा दिवाळीच्या तोंडावर हे खाद्यतेल किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी स्वस्त होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसाला ७० हजार किलो खाद्य तेलाची विक्री होत आहे. २४ सप्टेंबरपासून सरकारने खाद्यतेलावरील सीमा शुल्क कमी केल्याने दसरा-दिवाळी चांगली होणार आहे.

Advertisement

सरकारने २६ सप्टेंबरला अखिल भारतीय केंद्र सरकारकडून सीमा शुल्क कमी झाल्याने खाद्यतेल दर कमी होऊ लागले आहे. याची अंमलबजावणी २४ सप्टेंबरपासून लागू केली आहे. यामध्ये पान तेलावरील शुल्क दहा टक्क्यावरून पाच टक्के कमी केला आहे.

तसेच शुद्ध सोयाबीन आणि पाम तेलावरील शुल्क ३२.५टक्के वरून २७.५टक्ते पर्यंत कमी केले आहे. सूर्य फुल तेलावरील शून्य टक्के करण्यात आले आहे. त्याचबरोबर शुद्ध सूर्यफूल तेलावरील ३२.५ टक्ते वरून २२ टक्के सीमा शुल्क कमी केल्याने ग्राहकांना आता खाद्यतेलाच्या दराबाबत दिलासा मिळत आहे.
सध्या कोल्हापुरात खाद्य तेलाच्या दरामध्ये किलोमागे पाच रुपये दर कमी झाला आहे. येत्या दसरा-दिवाळीच्या तोंडावर आणखी दहा ते पंधरा रुपयांनी स्वस्त होणार आहे. मागच्या आठवड्यात सरकी १९४, शेंग तेल २३०, सूर्यफूल २२० पाम तेल १७५ रुपये किलो असा दर होता. या आठवड्यात हा दर कमी होऊन सरकी १९०, शेंगतेल २३०, सूर्यफूल २१५, पाम तेल १७० रुपये किलो असा दर आहे.

Advertisement

पॅकिंग व सुट्याबाबत निर्णय
खाद्यतेल कंपन्यांनी वजनामध्ये कमी करून ७५०, ८८०, ८००, ८१०, ८५० असे पॅकिंग काढले होते, पण आता शासनाने हे बदल करून अर्था किलो एक किलो दोन किलो पाच किलो व पंधरा किलो अशा पॅकिंगमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुट्या खाद्य तेलासाठी एक वर्षाची सूट देण्यात आली आहे. जर डॉलरचा दर व वाहतुकीच्या दरात वाढ झाल्यास दरामध्ये फरक होण्याची शक्यता आहे.

Advertisement

.