For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिनी वस्तूवरील बहिष्कारामुळे 'स्वदेशी’ला ‘अच्छे दिन '

02:48 PM Dec 12, 2022 IST | Kalyani Amanagi
चिनी वस्तूवरील बहिष्कारामुळे  स्वदेशी’ला ‘अच्छे दिन
Advertisement

स्वदेशी दिन विशेष : मेड इन इंडिया व मेड इन लोकलला प्राधान्य : कोल्हापुरात दिवाळीमध्ये 100 तर वर्षभरात 400 कोटींची चिनी वस्तूंची विक्री थंडावली :
स्थानिकांना रोजगार उपलब्ध

कोल्हापूर / विद्याधर पिंपळे

Advertisement

विदेशी कपडयाला विरोध व होळी करणारे, बाबू गेनू हे 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबई येथील एका कापड मिलसमोर हुतात्मा झाले. हा दिवस स्वदेशी दिन म्हणून देशभरात पाळला जाऊ लागला तो हुतात्मा बाबू गेनू यांच्या बलिदानामुळेच, देशात स्वदेशी चळवळीचा पाया घातला गेला. याबरोबर आझादी बचाओ आंदोलन, स्वदेशीसाठी शासकीय प्रोत्साहन त्याचबरोबर चिनी वस्तूवर टाकलेल्या बहिष्कारामुळे स्वदेशीचा वापर वाढू लागला आहे. मेक इन इंडियाबरोबर मेक इन लोकल यालाही चालना मिळू लागली. यामुळे कोल्हापुरात दिवाळीमध्ये 100 कोटीची तर वर्षभरात 400 कोटी रूपयाच्या विविध प्रकारच्या चिनी वस्तूंची आयात थ्ंांडावली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इंग्लडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला होता. भारतातील स्वस्त कापूस खरेदी करून, परदेशी तयार कापड आपल्या देशात जादा दराने पाठवण्याचा धडाका लावला होता. याला बाबू गेनू यांनी विरोध केल्याने, त्यांना हुतात्मा व्हावे लागले. हा दिवस आता स्वदेशी दिन म्हणून मानला जात आहे.

स्वदेशीसाठी शासनाचा प्रयत्न

Advertisement

स्वदेशीसाठी अधिक चालना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. ऑगस्ट 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशातील पहिल्या वार्षिक राष्ट्रीय हातमाग दिनानिमित, देशी हातमाग व खादी उत्पादकांना चालना देण्याची घोषणा केली. एवढेच नव्हे तर प्रत्येक शासकीय कार्यालयामधील कर्मचारी, अधिकारी यांनी खादीचा वापर करावा असे आवाहन केले होते.

देशात फक्त स्वदेशी उत्पादनांची विक्री व्हावी यासाठी, ‘आत्म निर्भार युवा, आत्मनिर्भार भारत’ या कॅचलाईनव्दारे, एक ऍप तयार करून, स्वदेशी वस्तूचीच खरेदी करावी असे आवाहन केले जात आहे. मेक इन इंडिया याचा एक उपक्रम म्हणून, स्वदेशीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रोत्साहन देण्यात आले आहे.

कैटचा चिनी वस्तूवर बहिष्कार

मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशभरात आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला आहे. यामध्ये स्वस्तात मस्त अशी ख्याती असलेल्या चिनी वस्तूंनी संपूर्ण बाजारपेठ व्यापली आहे. देशभरात बारा महिन्यापैकी पाच महिने विविध सण साजरे होत असतात. रोषणाईपासून फटाक्य़ापर्यंतच्या चिनी वस्तूशिवाय हे सण साजरे होत नाहीत, मात्र आता हे खोटे ठरवले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टैडर्स (कैट) या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेने गेल्या दोन वर्षापासून चिनी वस्तूवर बहिष्कार टाकून, मोठया प्रमाणावर जनजागृती सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षात याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. चिनी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध आणले आहे.

कैटच्या रिसर्च ऍन्ड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीच्या विभागाने, देशातील मोठया अशा बाजारपेठ असलेल्या 20 शहरांचे सर्वेक्षण केले. दिवाळीमध्ये चिनी फटाके, लाईट माळा, आकाश कंदील वा इतर वस्तूंची कोणतीच ऑर्डर चिनला दिलेली नाही. यामुळे यंदाच्या दिवाळीत देशभरात एक लाख करोड तर कोल्हापूर जिल्हयामधील 100 कोटी रूपयाची उलाढाल ठप्प झाली होती.. त्याऐवजी मेड इन इंडिया व मेड इन लोकलला प्राधान्य दिल्याने, कोरोना काळात कोल्हापूरात अनेकांनी स्टार्टअप घेतल्याने, लाईट माळा, पणती, आकाश कंदील बनवून बाजारात आणले होते. यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळून, अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.

धैर्यशील पाटील, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टैडर्स (कैट).

Advertisement
Tags :

.