For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पारा वाढल्याने शीतपेय कंपन्यांना ‘अच्छे दिन’

06:59 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
पारा वाढल्याने शीतपेय कंपन्यांना ‘अच्छे दिन’
Advertisement

शीतपेय व एसीच्या विक्रीत 40 टक्क्यांची वाढ अपेक्षित

Advertisement

नवी दिल्ली : 

थंड पेये आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनांना या उन्हाळ्यात मागणी वाढण्याची शक्यता आहे आणि तापमान 2023 पेक्षा जास्त असेल. गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे तापमान कमी झाले आणि विक्रीत घट झाली.

Advertisement

एफएमसीजी उत्पादकांनी यंदा विक्री 15-40 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याशिवाय रमजान आणि लोकसभा निवडणुकीमुळे एफएमसीजी कंपन्यांच्या उत्पादनांचा खप वाढण्याची दाट शक्यता आहे.

आयटीसीचे डेअरी आणि बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंघल यांनी सांगितले की, ‘आम्ही ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी तयार आहोत आणि गेल्या एका वर्षात अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत. यामध्ये नारळपाणी आणि फळांचे रस यांचा समावेश आहे.’

मदर डेअरीने 50 कोटींची गुंतवणूक केली

गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी 15 ते 20 टक्क्यांनी जास्त राहण्याची अपेक्षा रसना उत्पादक कंपनीला आहे. रसना ग्रुपचे चेअरमन पिरुझ खंबाट्टा म्हणाले, ‘गॅस सिलिंडरच्या किमतीतील कपातीतून वाचलेला पैसा शितपेयांसह इतर ग्राहकोपयोगी वस्तूंवर खर्च केला जाईल.’

मदर डेअरीने क्षमता वाढवण्यासाठी 50 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आहे आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आइक्रीम प्लांटही मागणी पूर्ण करण्यासाठी उभारला आहे. डेअरी क्षेत्रातील प्रमुख कंपनीने हंगामासाठी जय्यत योजना आखली आहे.

मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलीश म्हणाले, येत्या दीड महिन्यात आम्ही ग्रीक दहीही बाजारात आणू. आईक्रीमचे नवीन प्रकार  सादर करण्यासोबत सुधारित फ्लेवर्स आणि कुल्फीच्या लॉन्चसह विस्तारण्यासाठी तयारी केली जात आहे.’ गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विक्री 25-30 टक्क्यांनी वाढण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

डाबर नवीन उत्पादने लाँच करणार

‘जसे तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, आम्ही आइक्रीम, फ्लेवर्ड दूध आणि ताक यासह सर्व श्रेणींमध्ये वाढ पाहण्यास सुरुवात करू,’ बंदलीश म्हणाले.

डाबर विविध श्रेणींमध्ये उत्पादने लाँच करून उन्हाळ्यासाठी सज्ज आहे. डाबर इंडियाचे विक्री प्रमुख अंशुल गुप्ता म्हणाले, आम्ही यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे.

कंपनी पंतनगरमधील शीतपेयांच्या कारखान्यांमध्ये क्षमता वाढविण्याचे काम करत आहे. ‘याशिवाय, इंदूरमध्ये एरेटेड फ्रूट बेव्हरेजेससाठी एक युनिट आणि जम्मूमध्ये एरेटेड फ्रूट बेव्हरेजसाठी युनिट स्थापन करण्यात आले आहे,’ गुप्ता म्हणाले.

या उन्हाळ्यात एसीची विक्री वाढणार आहे. ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या विक्रीत जोरदार वाढ होण्याची अपेक्षा आहे.

ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी त्यागराजन म्हणाले, ‘या उन्हाळ्याच्या हंगामात एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्सची मागणी 20 टक्क्यांनी वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सणासुदीच्या हंगामानंतर आम्ही विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहिले आहे.’

Advertisement
Tags :

.