For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोंदिया-बालाघाट महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-बोलेरोच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू, 7 गंभीर

10:59 AM Sep 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोंदिया बालाघाट महामार्गावर भीषण अपघात  ट्रक बोलेरोच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू  7 गंभीर
Advertisement

गोंदिया : गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर नागरा परिसरात भरधाव ट्रक आणि बोलेरो प्रवासी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू, तर 7 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक गोंदियाहून बालाघाटच्या दिशेने जात होता. त्याचवेळी बालाघाटकडून गोंदियाच्या दिशेने बोलेरो प्रवासी वाहन येत होते. नागरा परिसरात दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी आणि मदत पथकाने तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

Advertisement

या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले असून सात जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताचे नेमके कारण आणि मृत-जखमींची ओळख याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Advertisement
Tags :

.