जिल्हास्तरीय स्पर्धेत गोमटेशचे यश
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक गटात गोमटेश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे. व प्राथमिक थ्रोबॉल संघाने विजेतेपद पटकाविले. जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत गोमटे स्कूलची खेळाडू समृद्धी सोनारने 100 मी. मध्ये रौप्यपदक, 200 मी. मध्ये सुवर्णपदक, 100 मी. अडथळा शैर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. अक्षरा मजुकरने 800 मी. धावणे, 1500 मी. धावणे व 3000 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासह 3 सुवर्णपदके पटकावित वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
फाल्गुन पाटीलने 800 व 1500 मी. धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक, 4×400 मी. रिले संघाने सुवर्णपदक पटकाविले. या संघात फाल्गुन पाटील, सागर, रितेश खण्णूकर व महेश ढवळे यांचा समावेश आहे. मुलींच्या 4×100 मी. व 4×400 मी. रिलेमध्ये समृद्धी सोनार, अक्षरा मजुकर, मृदुला पवार व सेजल महीर वाडे यांनी सुवर्णपदकासह विजेतेपद पटकाविले. त्याचप्रमाणे प्राथमिक विभागात प्रतीक्षा कुरबरने 600 मी. धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. तर प्राथमिक थ्रो बॉल संघाने विजेतेपद पटकाविले आहे. वरील सर्व खेळाडूंना गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठता व माजी आमदार संजय पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील व सरोजा यांचे प्रोत्सहन, क्रीडा शिक्षक महावीर जनगौडा व किरण तारळेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.