For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : दीपावली सुट्टीत परतीच्या प्रवासात गोमेवाडी मित्रांवर अपघाताचा घाला

02:57 PM Oct 26, 2025 IST | NEETA POTDAR
satara   दीपावली सुट्टीत परतीच्या प्रवासात गोमेवाडी मित्रांवर अपघाताचा घाला
Advertisement

                           आटपाडी तालुक्यात परतीच्या प्रवासात भीषण अपघात

Advertisement

आटपाडी : दीपावली सुट्टीत फिरायला गेलेल्या गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील मित्र मंडळींवर परतवाडा (जि. अमरावती) नजिक काळाने घाला घातला. एसटी बस आणि क्रुझर गाडीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाले. तर सातजण जखमी झाले.

मृतामध्ये गोमेवाडी येथील एक आणि कलेढोण (ता. खटाव जि. सातारा) येथील एकाचा समावेश आहे. या घटनेने गोमेवाडीसह आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली. दस्तगीर उर्फ मुन्ना मुलाणी (रा. गोमेवाडी) आणि आप्पासो अलकरी (रा. कलेढोण जि. सातारा) अशी मृताची नावे आहेत.

Advertisement

तर पोपट जगताप, प्रणव जगताप, सुखदेव सरगर, बिरूदेव जावीर, मुकुंद देशपांडे (रा. सर्व गोमेवाडी), सदानंद सस्ते (रा. काळेवाडी ता. आटपाडी) आणि महेश माहुरकर (रा. अमरावती) अशी जखमींची नावे आहेत.

Advertisement
Tags :

.