वडगाव क्लस्टर क्रीडा स्पर्धेत गोमटेशला विजेतेपद
बेळगाव : डी. टी. देसाई पब्लिक स्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वडगाव व खासबाग क्लस्टरच्या प्राथमिक क्रीडा स्पर्धेत गोमटेश स्कूल हिंदवाडी शाळेने 86 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तर मुलांच्या गटात गोमटेश शाळेने 46 गुणांसह व मुलींच्या गटात डी. टी. देसाई इंग्लिश मीडियम स्कूलने 44 गुणांसह विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील वैयक्तिक गटात कामधेनू इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिवराज मेलगेने तर मुलींच्या गटात प्रतीक्षा बंडू कुरबूर हिने वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत क्लस्टरच्या 27 शालेय संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, शहराच्या पीईओ जहिदा पटेल, ग्रामीण पीईओ साधना बद्री, डी. टी. देसाई संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र देसाई, मुख्याध्यापिका प्रतीक्षा देसाई, आय एम. सनदी, शिला सानिकोप्प, भरत बळ्ळारी, रमेश सिंगद, अनिल जनगौडा, महावीर जनगौडा, किरण तारळेकर, महावीर बुडगौडर, बी. जी. सोलोमन, मिलिंद मुद्दनूर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.