गोमंतकीयांच्या हृदय तपासणीसाठी उद्या डॉ. एम. डी. दीक्षित गोव्यात
सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत करणार तपासणी : हृदय रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन
बेळगाव : बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने हृदयरोग तपासणीचे आयोजन शनिवार दि. 9 डिसेंबर रोजी गोवा स्कॅन सेंटर, पर्वरी येथे सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत होणार असून प्रसिद्ध हृदय शस्त्रचिकित्सक डॉ. एम. डी. दीक्षित हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. तरी हृदयासंबंधी समस्या असलेल्या रुग्णांनी विशेषत: तरुण पिढीने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले आहे. तरुणांमध्ये दिसणाऱ्या हृदयविकाराच्या वाढत्या घटना हा चिंतेचा विषय बनला आहे. पूर्वी सहसा वृद्धांना हृदयविकाराचा झटका यायचा, पण आता त्याच्याही पेक्षा जास्त हृदयविकाराचा झटका हा तरुण मुला-मुलींना येऊ लागल्याचे दिसत आहे. आज हृदयविकाराच्या 25 टक्के प्रकरणांमध्ये तरुणपिढी बळी पडताना दिसत आहे. या बदलाचे प्रमुख कारण म्हणजे तरुण पिढीची बदलती जीवनशैली. ते ज्या पद्धतीने खाण्याच्या, झोपण्याच्या, कामाच्या सवयी अंगिकारत आहेत, त्यामुळे त्यांच्या हृदयावर खोल परिणाम होत आहे. आजकाल युवक करिअर, चांगली नोकरी आणि दर्जेदार जीवनशैली यांच्याबाबत चिंता करून तणावाखाली असल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. आजच्या व्यस्त आणि स्पर्धात्मक वातावरणात, तणाव वाढला आहे. ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. हृदयविकार असणारे रुग्ण, छातीत वेदना असणे, बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिलेले रुग्ण, हृदयाच्या झडपांचे आजार, जन्मजात हृदयविकार असणारे रुग्ण, नवजात शिशू व लहान मुलांमधील हृदयविकार, हृदयाला छिद्र असणारे रुग्ण, श्वासोच्छ्वासाचा त्रास असणे, हार्ट फेल्युअर रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले आहे.
अरिहंत हॉस्पिटलला एनएबीएचची मान्यता
प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची रुग्णसेवा मिळावी, सर्वसामान्य जनतेला एकाच छताखाली सर्वश्रेष्ठ आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी हॉस्पिटल कार्यरत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेळगाव शहरातील अरिहंत हॉस्पिटल होय. सर्वसामान्य नागरिकांना योग्य त्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी हॉस्पिटल तत्पर असून गत वर्षभरापासून हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य अखंडितपणे सुरू आहे. कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब म्हणजे भारतात आरोग्य विषयक सुविधांना मान्यता देणारी किंवा त्यांचा दर्जा ठरवणारी मानाची नॅशनल अक्रेडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) संस्थेकडून हॉस्पिटलला नुकताच पूर्ण गुणवत्ता मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत हॉस्पिटल आणखी मजबुतीने सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. एचसीओ श्रेणी अंतर्गत एनएबीएचद्वारे पाचव्या आवृत्तीसह पूर्ण मान्यता प्राप्त करून घेणारे उत्तर कर्नाटकमधील पहिले अरिहंत हॉस्पिटल आहे.
मुलांवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध
डॉ. एम. डी. दीक्षित हे लहान मुलांमधील हृदयविकारांवर उपचार करण्यात अग्रणी असून ते लहान मुलांवर उपचार व हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नुकताच गोव्यातील 10 दिवसांच्या व इराकमधील 30 दिवसांच्या नवजात बालकांवर डॉ. एम. डी. दीक्षित यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये हृदयाची समस्या असलेल्यांनी डॉ. एम. डी. दीक्षित यांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9036102390 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.