महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोमंतकीय रांगोळी कलाकारांची ‘कलाम जागतिक रिकॉर्ड’ला गवसणी

12:32 PM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युवा रांगोळी कलाकार भूमेश नाईकसह 5 जणांचा गौरव

Advertisement

फोंडा : गोमंतकीय युवा रांगोळी कलाकार भूमेश नाईक व पाच सहकाऱ्यानी डॉ. ए. पी जे अब्दूल कलाम यांच्या पोट्रेटसह साकारलेल्या चांद्रयान 3 ची जगातील सर्वात मोठी हायपर रिएलीस्टीक भव्य रांगोळीला ‘कलाम जागतिक रिर्कार्डस’ला गवसणी घातली आहे. या जागतिक विक्रमाला सांघिक रांगोळी श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. चांद्रयान-3 मोहीमेच्या आदल्या दिवशी रांगोळी कलाकार भूमेश नाईक यांनी विकास फडते, प्रमोद नार्वेकर, अर्जुन नाईक, प्रताप गोवेकर, दर्शन नाईक यांच्यासह सांखळी येथील रविंद्र भवनात मिसाईल मॅन म्हणून परिचित माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांच्या पोट्रेटसह चांद्रयान 3 ची हायपर रिएलिस्टीक रांगोळी साकारली होती. 14 बाय 11 मिटर जागेत केवळ 30 तासांत ही भव्य रांगोळी 13 ऑक्टो रोजी साकारली होती. याची दखल कलामस् वल्ड रॅकोर्ड या संस्थेने घेतली असून सर्व रांगोळी कलाकारांचा चषक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. कलाम जागतिक रेकॉर्ड ही आयएसो 9001-2015 प्रमाणित संस्था आहे. भूमेश नाईक व टिमचा यापुर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते सत्कार झालेला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article