For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑनलाईन ट्रेडिंगच्या जाळ्यात सुवर्णकार

10:50 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑनलाईन ट्रेडिंगच्या जाळ्यात सुवर्णकार
Advertisement

तब्बल 22 लाख 50 हजाराची फसवणूक

Advertisement

बेळगाव : ‘ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, अधिक नफा मिळवा’ असे सांगत सावजांना ठकवण्याचे प्रकार सुरूच आहेत. अनगोळ येथील एका सुवर्णकाराला 22 लाख 50 हजार रुपयांना ठकवण्यात आले असून यासंबंधी शहर सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गजानन अणवेकर (वय 52) रा. अनगोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीईएन विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. 10 जानेवारी 2024 रोजी फेसबुकवर आलेली ट्रेडिंग व्यवहारासंबंधीची जाहिरात बघून ते फशी पडले आहेत. सायबर गुन्हेगारांनी पाठविलेल्या लिंकवर, त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या अॅपवर व्यवहार सुरू करण्यात आले. व्हॉट्सअॅपवर चॅटिंगही सुरू झाले. सुरुवातीला शंभर रुपये व 49 हजार रुपये गुंतवणुकीवर तत्काळ 10 हजार रुपये परतावा देण्यात आला.  त्यानंतर त्यांचा या भामट्यावर विश्वास बसला व त्यांनी 22 लाख 50 हजार रुपये एकरकमी गुंतविले. सायबर गुन्हेगारांनी त्यांना ठकविले आहे. सुशिक्षित नागरिकच बोगस अॅप व ट्रेडिंगच्या माध्यमातून फशी पडत आहेत. फेसबुक किंवा इतर समाजमाध्यमांवर येणाऱ्या गुंतवणुकीच्या व झटपट नफा देण्याचे आमिष दाखविणाऱ्या जाहिरातबाजीवर विश्वास ठेवून सुरुवातीला 100 ते 500 रुपये गुंतवणूक केली जाते. त्याचा परतावा मिळाला की लाखो रुपये गुंतविले जातात. रक्कम वाढली की आपोआप अॅपच बंद होतो. सायबर क्राईम विभागाच्या मते गुंतवणूक करण्यासाठी गुन्हेगारांनी दिलेले अॅप खरे आहे की खोटे? याची खातरजमा न करताच ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे आहे. याची खातरजमा करण्यासाठी ‘zaल्ंaम्दज्’वर गुगल सर्च केल्यास त्या कंपनीचा खरा-खोटेपणा उघडकीस येतो. खातरजमा न करताच गुंतवणूक केलेले अनेक जण फशी फडत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.