For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय जीडीपी दर 6.8 टक्के राहण्याचे गोल्डमॅन सॅचचे संकेत

06:02 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय जीडीपी दर 6 8 टक्के राहण्याचे गोल्डमॅन सॅचचे संकेत
Advertisement

2026 वर्षासाठीचा अंदाज : कच्चे तेल दर घसरण, पश्चिम आशियातील सुधारणांचे दिले कारण

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांती करारातील स्थितीनुसार जागतिक गुंतवणूक बँक गोल्डमॅन सॅच यांनी 2026 कॅलेंडर वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.8 टक्के इतकी विकसित राहणार असल्याचा अंदाज नव्याने वर्तवला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण त्याचप्रमाणे पश्चिम आशियात कमी झालेला तणाव या पार्श्वभूमीवर भारताला आर्थिक वृद्धीमध्ये तेजी प्राप्त करणे शक्य होणार आहे.

Advertisement

येत्या काळात परिस्थिती सामान्य होऊन महागाईचा ताणही कमी होऊ शकणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. हवामान संबंधित जोखीम आणि व्याजदराबाबतची चिंता मात्र बँकेने व्यक्त केली आहे. कॅलेंडर वर्ष 2026 साठी भारताचा जीडीपी वृद्धी दर 6.8 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज गोल्डमॅन सॅच यांनी वर्तवला आहे. या आधी 6.5 टक्के इतकी वृद्धी राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. सध्याची सुधारीत स्थिती लक्षात घेऊन आपल्या जुन्या जीडीपी अंदाजामध्ये 0.3 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. यापूर्वी इस्राइल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे होर्मुझ खाडी बंद झाल्यामुळे बँकेने भारताचा विकास दर कमी अंदाजित व्यक्त केला होता.

कच्च्या तेलाचे दर झाले कमी

होर्मुझमधून भारताच्या ऊर्जा आयातीचा वाटा हा 60 टक्के इतका आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्रुड बास्केटची किंमत सलग तीन महिने 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त राहिली होती. मात्र जूनमध्ये ही कमी होऊन 86.31 डॉलर प्रति बॅरलवर आली. याच दरम्यान 24 जून रोजी भारतीय क्रूड बास्केटची किंमत 70.71 डॉलर प्रति बॅरल इतकी राहिली होती.

Advertisement
Tags :

.