For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लॉरेन्स टोळीपासून गोल्डी ब्रार विभक्त

06:22 AM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
लॉरेन्स टोळीपासून गोल्डी ब्रार विभक्त
Advertisement

टोळीत फूट : रोहित गोदारानेही सोडली साथ

Advertisement

वृत्तसंस्था/ अमृतसर

देश-विदेशात आपले नेटवर्क चालवणाऱ्या गँगस्टर लॉरेन्सच्या टोळीत फूट पडली आहे. कॅनडाहून लॉरेन्सच्या टोळीला हाताळणारा गँगस्टर गोल्डी ब्रार आता रोहित गोदारासोबत वेगळा झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दोघांनीही लॉरेन्स टोळीपासून स्वत:ला दूर केले असल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नसली तरी त्यांच्यात काही काळापासून दुरावा निर्माण झाल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू आहे.

Advertisement

लॉरेन्स स्वत:ला हिंदू गँगस्टर म्हणून दाखवतो. तर गोल्डी ब्रार खलिस्तानी दहशतवाद्यांशी संपर्कात आहे. यामुळे दोघांच्या विचारसरणीतील फरक हे टोळीतील दुफळीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा टोळीचा म्होरक्या असून गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी यापूर्वी लॉरेन्सच्या आदेशानुसार भारतातील अनेक राज्यांमध्ये हल्ले केले आहेत. आता त्यांनी लॉरेन्सशिवाय घटना घडवण्यास सुरुवात केली आहे.

रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांनी कॅनडामध्ये व्यापारी हरजीत सिंग ध•ा याच्या हत्येची जबाबदारी घेतल्यावर टोळी वेगळे झाल्याचा पुरावा सापडला. परंतु यावेळी त्यांनी लॉरेन्स टोळीचा उल्लेख केला नाही. त्याचवेळी, पंचकुलामध्ये देखील, सोनू नोल्टा कुस्तीगीराच्या हत्येची जबाबदारी टोळीचे नाव न घेता केवळ अनमोल बिश्नोईचे नाव घेऊन घेण्यात आली. यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, कोणत्याही बाजूकडून याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

Advertisement
Tags :

.