महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोल्डनबॉय नीरज, सिंधू सुवर्ण अध्यायासाठी सज्ज

06:05 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी दोघेही प्रयत्नशील

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस, नवी दिल्ली

Advertisement

गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवल्यानंतर यंदा एक पाऊल पुढे जात सोनेरी यश मिळवण्याचे ध्येय भारताची आघाडीपटू बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बाळगले आहे. 26 जुलैपासून सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीचा सिंधूला विश्वास आहे. याशिवाय, भालाफेकपटू ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा नवा सुवर्णअध्याय रचण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑलिम्पिक असो, कॉमनवेल्थ गेम्स असो किंवा आशियाई गेम्स, प्रत्येक वेळी त्याच्या भालाफेकने पदकाचा अचूक वेध घेतला आहे. आता, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सिंधू व नीरज ही भारताची अव्वल जोडगोळी सुवर्णपदकाचा वेध घेणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 26 वर्षीय नीरज चोप्राला जवळपास प्रत्येक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची सवय झाली आहे. 2016 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर

भारतासाठी पदक मिळवायला सुरुवात केली, यावेळी तो अवघ्या 19 वर्षांचा होता. ज्या वयात भारतातील तरुण आपल्या करिअरचा फारसा विचार करु शकत नाहीत, त्या वयात नीरजने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी गोल्ड जिंकले होते. तेव्हापासून नीरजने मागे वळून पाहिले नाही. आजघडीला जागतिक स्तरावरील स्पर्धा म्हटले की नीरज पदक मिळवणारच असे समीकरण झाले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात नीरजने सुवर्ण मिळवल्यानंतर भारतीय अॅथलेटिक्स क्षेत्राला नवी झळाळी मिळाली आहे. यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तो टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सिंधूही सोनेरी यशासाठी प्रयत्नशील

गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धेतील यशानंतर सिंधूला आता भारताची पहिली महिला सुवर्णपदक विजेती म्हणून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवण्याची नामी संधी आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी आपण उत्सुक असून त्यादृष्टीनेच तयारी करत असल्याचे सिंधूने सांगितले. 2016 आणि 2020 च्या स्पर्धेतील प्रवास अविस्मरणीय होता. या दोन्ही स्पर्धेत पदकापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मी नव्या जोमाने उतरेन आणि काहीही झाले तरी 100 टक्के योगदान देऊनच खेळेन, असा विश्वास सिंधूने व्यक्त केला. सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक मिळवणे सोपे नाही, मात्र, मी केवळ सुवर्णपदकावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही ती म्हणाली.

मागील दोन ऑलिम्पिकमधील अनुभवांनी खेळाडू म्हणून फार समृद्ध केले आहे. या अनुभवांचा मलापॅरिस ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे फायदा होईल. पदकाबाबत मला अतिआत्मविश्वास बाळगायचा नाही. मी पूर्ण तयारीनिशीच स्पर्धेत उतरेन, यात शंकाच नाही.

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू, पीव्ही सिंधू.

पॅरिस ऑलिम्पिक माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. जागतिक स्तरावरील अनेक दिग्गजांचे यंदा आव्हान असणार आहे. पण तरीही सुवर्णपदक जिंकण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

नीरज चोप्रा, भारताचा दिग्गज भालाफेकपटू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article